व्यक्तीने चावून खाल्ला साप.
डेहराडून, 23 मे : साप म्हणताच अनेकांना दरदरून घाम फुटला असेल. सापा ला पाहूनच तोंडचं पाणी पळतं. पण अशा सापाला चक्क एका माणसाने त्या सापाला कचाकचा चावून खाल्लं आहे. भुकेबरोबर व्यक्तीने सापाला खाल्लं आहे. या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हातगाडीवर बसलेली ही व्यक्ती. या व्यक्तीच्या समोर साप येताच त्याने त्याला हातात धरून त्याचं तोंड आपल्या तोंडात घेतलं आणि दातांनी कचाकचा चावायला सुरुवात केली. दातांनी त्याने सापाचं तोंड तोडून काढलं. इतक्यावरच तो थांबला नाही तर त्या सापाला त्याने त्यानंतर कोल्ड ड्रिंकमध्ये सापाला बुडवलं आणि खायला सुरुवात केली.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये व्यक्ती आईस्क्रीमच्या गाडीवर बसली आहे. तिथंच तिने साप पकडला. यानंतर त्याने दातांनी सापाचं तोंड आपल्या तोंडात टाकून चावून तोडलं. त्यानंतर त्याने तोंडातला सापाचा तोंडाचा भाग आणि रक्त थुंकलं. सापाला त्याने गाडीवर ठेवलं. नंतर खाली जमिनीवर फेकून दिलं. या व्यक्तीचं हे खतरनाक कृत्य इथं थांबलं असं वाटलं. पण यापुढे यापेक्षाही धक्कादायक घडलं.
एका सापाची एंट्री अन् 16000 घरात एकाच वेळी असं काही घडलं की सर्वांची झोप उडाली
या व्यक्तीने पुन्हा तो साप जमिनीवर उचलला. त्याने आपल्या खिशातून कोल्डड्रिंकची बाटली काढली. त्यात थोडंसं कोल्डड्रिंक होतं. एका हातात साप आणि दुसऱ्या हातात कोल्डड्रिंक घेऊन त्याने सापाच्या तोडलेल्या तोंडावर थोडं थोडं कोल्डड्रिंक टाकलं आणि चोखू लागला. आईस्क्रीम खावं तसं तो सापावर कोल्डड्रिंक टाकून चाटून खात होता. माहितीनुसार ही धक्कादायक घटना उत्तराखंडमधील असल्याचं सांगितलं जातं आहे.