JOIN US
मराठी बातम्या / Viral / रिकाम्या खुर्चीवर अचानक तरुणी कशी येते? जादूगाराची ती मॅजिक ट्रिक आली समोर, पाहा VIDEO

रिकाम्या खुर्चीवर अचानक तरुणी कशी येते? जादूगाराची ती मॅजिक ट्रिक आली समोर, पाहा VIDEO

रिकाम्या खुर्चीत अचानक येणारी तरुणी, या मॅजिकचं सिक्रेटही समोर आलं आहे.

जाहिरात

जादूचा व्हिडीओ व्हायरल

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 19 मे : मॅजिकल शो पाहायला कुणाला आवडत नाही. आजवर जादूचे बरेच व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. काही जादूच्या ट्रिकही तुम्हाला माहिती असतील. पण काही जादू अशा असतात की त्या करतात तरी कशा असा प्रश्न पडतो. अशाच जादूपैकी एक म्हणजे रिकाम्या खुर्चीत अचानक एखादी तरुणी येणं. पण आता या मॅजिकचं सिक्रेटही समोर आलं आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. तुम्ही पाहिलं असेल मॅजिक शोमध्ये जादूगार एक रिकामी खुर्ची घेतो आणि त्या खुर्चीवर एक कापड टाकून हलवतो आणि काढतो. अचानक त्या खुर्चीवर एक सुंदर तरुणी बसलेली दिसते. आता ही खुर्ची अशा ठिकाणी असते, जिथं आजूबाजूला दुसरं कुणीच किंवा काहीच नसतं. त्यामुळे ही तरुणी आली तरी कशी आणि कुठून असा प्रश्न पडतो. आता याच मॅजिकचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडीओतून या मॅजिकचं सिक्रेटही समोर आलं आहे. Shocking! इथं अचानक गायब होतायेत चालत्या गाड्या; रहस्यमयी पुलाचा चक्रावून टाकणारा VIDEO व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक काळी खुर्ची दिसते आहे. त्यावर जादूगार काळ्या रंगाचं कापड टाकून ते हलवतो आणि काढतो. त्या रिकाम्या खुर्चीवर एक सुंदर तरुणी दिसते. तरुणी खुर्चीवरून उभी राहते आणि जादूगाराची पोलखोल होते. जादूगाराची एक चूक नेटिझन्सनी पकडली आहे. तुम्ही व्हिडीओ नीट पाहिला तर दिसेल खुर्चीवर जिथं बसतो. तिथला भाग थोडासा वर आल्यासारखा दिसतो आहे. खुर्चीत तिथं गॅप दिसतो आहे. आधी हा गॅप नव्हता पण जशी तरुणी त्या खुर्चीवर आली तसा तो गॅप दिसला. हे पाहिल्यानंतर अनेकांनी ही तरुणी त्या खुर्चीतच होती, त्या गॅपमधून ती बाहेर आल्याचं म्हटलं आहे. तर काही जणांनी एवढ्याशा खुर्चीत तरुणी कशी काय राहू शकते, असा सवालही उपस्थित केला आहे. बापरे! अशा रूपात यमराज येईल कुणी विचारही केला नाही; मृत्यूचा थरारक LIVE VIDEO @Figensport नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

तुम्हाला हा व्हिडीओ पाहिल्यानंतर काय वाटतं, ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या