जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Shocking! इथं अचानक गायब होतायेत चालत्या गाड्या; रहस्यमयी पुलाचा चक्रावून टाकणारा VIDEO

Shocking! इथं अचानक गायब होतायेत चालत्या गाड्या; रहस्यमयी पुलाचा चक्रावून टाकणारा VIDEO

या पुलावरून गायब होतात गाड्या.

या पुलावरून गायब होतात गाड्या.

अजब अशा पुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

मुंबई, 19 मे :  आजवर तुम्ही बरेच एक्स्प्रेस-वे, हायवे, ब्रीज पाहिले असतील. अशाच एका ब्रीजचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यावर चालणाऱ्या गाड्या अचानक गायब होत आहेत. रहस्यमयी असा पूल ज्याचा व्हिडीओ पाहून सर्वजण चक्रावले आहेत. या गाड्या अचानक कुठे गायब होत आहेत, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. या अजब पुलाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता या पुलावरून गाड्या जातात. पण त्या पुलाच्या कठड्याच्या दिशेने येतात. आता एखादी गाडी कठड्याला धडकली तर ती कठडा तोडून खाली येईल. पण या व्हिडीओत तसं काहीच होत नाही. एकामागोमाग कित्येक गाड्या या कठड्याच्या दिशेने जातात. कठड्याला धडकतात पण त्या नंतर दिसतच नाहीत. पुलाच्या खाली पाणी दिसत आहे, त्या पाण्यातही या गाड्या पडत नाही. कठड्याच्या तिथंच गायब होतात. आश्चर्य म्हणजे कठड्यालाही काही झालेलं दिसत नाही. व्हिडीओ पाहून तुम्हीही चक्रावला असाल. आता हे कसं शक्य आहे, खरंच या गाड्या गायब होत आहेत का? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर हा व्हिडीओ नीट पाहा. गाडी चालवत असतानाच दुचाकीस्वाराच्या डोक्यावर पडला झाडावरील नारळ; पुढे भयानक घडलं, VIDEO तुम्हाला जो पुलाचा कठडा वाटतो आहे, तो खरंतर एका बिल्डिंगचा वरी भाग आहे, जो एका पुलाच्या कठड्यासारखा आणि रस्ता पुलासारखा दिसत आहे. बिल्डिंगच्या वरील भाग पाण्यासारखा वाटत आहे. गाड्या रस्त्यावर वळणं घेत या बिल्डिंगमध्ये जात आहेत. पण ती कठड्याला धडकल्यासारखी वाचक आहेत. ज्या कॅमेऱ्यात हे दृश्य कैद झालं आहे तो कॅमेरा अशा पद्धतीने लावण्यात आला आहे की रस्त्याच्या खालील भाग आणि बिल्डिंगचा वरील भाग दिसत आहे. ते एकमेकांच्या इतके जवळ आहेत की तो एखाद्या नदीवरील पूल आणि पुलाचा कठडाच असावा असा भास होतो आहे. जीव धोक्यात घालून तरुणाचा भयानक स्टंट, PHOTO पाहून उडेल थरकाप @cctvidiots ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

जाहिरात

तुम्हाला हा व्हिडीओ पाहताच क्षणी काय वाटलं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात