मुंबई, 17 मे : मृत्यू कधी, कुठे, कसा, कुणाला गाठेल सांगू शकत नाही. एका व्यक्तीला चालता-बोलता मृत्यूने गाठलं आहे. रस्त्यात अवघ्या काही सेकंदातच त्याच्यावर मृत्यू कोसळला आहे. मृत्यूचा हा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मृत्यूचा लाइव्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ पाहूनच तुमच्या अंगावर अक्षरशः काटा येईल. दोन व्यक्ती एकमेकांसोबत बोलत शांतपणे रस्त्यावरून चालत होते. इतक्यात मृत्यूच त्यांच्या दिशेने आला. एका व्यक्तीवर हा मृत्यू धडकला. व्यक्ती धाडकन रस्त्यावर कोसळली आणि जागच्या जागीच तिचा जीव गेला. रस्त्यावर कोसळल्यानंतर या व्यक्तीच्या शरीराची हालचालच झाली नाही. सर्वकाही इतक्या वेगाने घडलं की पाहून तुम्हाला धक्का बसेल. विश्वासच बसत नाहीये! मृत्यूवर अशी मात शक्यच नाही; VIDEO पाहून तुम्हीच सांगा, हे Real की Fake? व्हिडीओत पाहू शकता एक महिला आणि पुरुष रस्त्याने चालत आहेत. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने एक टायर उडच येताना दिसतो. हा टायर वेगाने येतो आणि त्या व्यक्तीला आदळून पुढे जातो. टायर इतक्या जोरात बसतो की ती व्यक्ती धाडकन जमिनीवर कोसळते. त्यानंतर त्याच्यासोबत असलेली महिला तिला उठवण्याचा प्रयत्न करते. पण व्यक्ती उठत नाही. तिच्या शरीरात काहीच हालचाल दिसत नाही. @cctvidiots अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून सर्वजण हैराण झाले आहेत.
— CCTV IDIOTS (@cctvidiots) May 15, 2023
या व्यक्तीचा मृत्यू झाला का? असा सवाल बहुतेक युझर्सनी केला आहे. तर एका युझरने कमेंट करताना त्याची कवटी फुटली असावी पण तो वाचला, असं सांगितलं आहे. कारला धडकून ट्रकखाली गेला तरुण, पण अपघातानंतर पुढे जे घडलं ते अविश्वसनीय; पाहा VIDEO पण ज्या पद्धतीने टायर त्या व्यक्तीला आदळला त्यावरून कदाचित या व्यक्तीचा जीव वाचला नसावा असंच दिसून येतं.