JOIN US
मराठी बातम्या / Viral / VIDEO - या प्राण्यासमोर जंगलाच्या राजाचाही हवा टाईट; पाहताच सिंहांनी ठोकली धूम

VIDEO - या प्राण्यासमोर जंगलाच्या राजाचाही हवा टाईट; पाहताच सिंहांनी ठोकली धूम

जंगलाचा राजा सिंहही जंगलातील एका प्राण्याला घाबरताना दिसला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

जाहिरात

सिंहाचा व्हिडीओ व्हायरल.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 08 एप्रिल : सिंहाला जंगलाचा राजा म्हणतात. त्याने डरकाळी फोडली की त्याचा दुरून आवाज ऐकूनच कित्येक प्राणी पळून जातात. पण ज्याला जंगलातील सर्व प्राणी घाबरतात असा जंगलाचा राजा सिंहही कुणाला तरी घाबरत असेल, असं तुम्हाला सांगितलं तर… साहजिकच विश्वास बसणार नाही. पण असाच एक आश्चर्यकारक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. सिंहही कुणाला तरी घाबरू शकतो, हे या व्हिडीओतून दिसून येतं आहे. जंगलातील एक असा प्राणी ज्याला जंगलाचा राजाही घाबरतो. त्याच्यावर हल्ला करणं किंवा त्याची शिकार करणं सोडा, सिंहाची त्याच्या जवळ जाण्याचीही हिंमत झाली नाही. किंबहुना जसा हा प्राणी त्याच्यासमोर आला, तशी सिंहाने त्याच्या रस्त्यातून काढता पाय घेतला. हा प्राणी दिसताच त्याने तिथून धूम ठोकली आहे.

आता सिंहही घाबरला असा हा प्राणी आहे तरी कोण हे पाहण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल ना? चला तर मग व्हिडीओ पाहुयात. आश्चर्य! ज्या श्वानाची शिकार करायला आला बिबट्या, त्याचाच वाचवला जीव; पण का? पाहा VIDEO व्हिडीओत तुम्ही पाहाल तर जंगलात रस्त्याच्या कडेला दोन सिंह शांतपणे आराम करत आहेत. इतक्यात समोरून दोन गेंडे चालत येताना दिसतात. गेंड्यांना पाहताच सिंह उठून उभे राहतात. आता सिंहाचा स्वभाव आपल्याला माहिती आहे, त्यानुसार या सिंहांनी गेंड्यांवर हल्ला करणं अपेक्षित होतं. पण हे काय? इथं मात्र उलटंच घडतं. गेंड्यांना पाहून दोन्ही सिंह भिगी बिल्ली बनले आहेत.  सिंह इतके घाबरले आहेत की ही भीती त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत आहेत. दोन्ही सिंह गेंड्यांच्या वाटेतून बाजूला होतात. त्यांचा मार्ग मोकळा करून देतात. दोघंही बाजूला असलेल्या झाडांमध्ये गप्पपणे निघून जातात. सर्व प्राण्यांवर भारी पडणारे सिंह इथं मात्र कमकुवत ठरले. VIDEO - म्हशींना पाहून सिंहाने बेशुद्ध होण्याचं केलं नाटक पण…; जंगलाच्या राजावर उलटा पडला त्याचाच डाव @TheFigen_ ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. सिंहाचं असं रूप आणि त्याची अशी अवस्था पाहून सर्वांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. बहुतेकांनी गेंडा जंगलाचा राजा आहे की काय? असाच सवाल उपस्थित केला आहे.

संबंधित बातम्या

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं, तुमची प्रतिक्रिया आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या