मुंबई, 05 मार्च : सिंह म्हणजे जंगलाचा राजा. ज्याला भलेभले प्राणी ही घाबरतात. पण काही असे प्राणी जे सिंहाशी पंगा घ्यायाला मागे पुढे पाहत नाहीत आणि त्याच्यावर मातही करतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. म्हशींना पाहून सिंहाने बेशुद्ध होण्याचं नाटक केलं. पण त्यानंतर त्याच्यासोबत जे घडलं ते धक्कादायक आहे. म्हैस आणि सिंहाच अवघ्या दोन मिनिटांचा हा धडकी भरवणारा असा व्हिडीओ आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, म्हशींचा कळप दिसतो आहे. खाण्याच्या शोधात त्या इकडेतिकडे भटकत आहेत. थोड्याच अंतरावर जंगलाचा राजा सिंह भक्ष्यासाठी दबा धरून बसला आहे. शिकारी आपल्याजवळच येत आहे, याची चाहूल त्याला लागली. पण जसजसे शिकारी जवळ आले तशी त्यांना पाहून त्याला धडकीच भरली. तो एक शिकारी नव्हता तर म्हशींचा कळपच होता. ज्यांच्याशी सामना करण्याची हिंमत काही सिंहाची झाली नाही.
या म्हशी आपली काय अवस्था करतील याची माहिती कदाचित य़ा सिंहाला होती. म्हणून त्याने त्यांच्याशी पंगा न घेण्याचं ठरवलं. पण आता त्याला आपला जीव वाचवायचा होता. त्यासाठी त्याने म्हशींना पाहून त्यांच्यासमोह बेशुद्ध होण्याचं नाटक केलं. काही म्हशी त्याच्याजवळ आल्या. त्यांनी सिंहाला नीट पाहिलं, सिंह जिवंत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि मग काय त्यांनी सिंहाला धडा शिकवलाच. …अन् घोड्याने स्वतःलाही आगीत झोकलं; VIDEO च्या शेवटी आहे कारण, पाहूनच डोळ्यात पाणी येईल एकेएक करत सर्व म्हशींनी सिंहाला आपल्या शिंगावर घेऊन हवेत उडवलं. त्याला चारही बाजूंनी घेरत त्याच्यावर हल्ला केला. शेवटी सिंहाने एका झाडाजवळ जात स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला. तिथंही म्हशींनी त्याला मारलं. शेवटी त्याची इतकी भयंकर अवस्था झाली की त्याला उठताही येत नव्हतं. थोड्या वेळाने सिंहाचा कळप तिथं आला. पण तोपर्यंत म्हशींनी आपला सर्व खेळ संपवला होता, त्या तिथून निघूनही गेल्या. बिच्चारा घाबरलेला सिंह एका झाडाखाली शांत बसलेला दिसतो आहे. म्हशींच्या कळपात सिंह असा अडकला की शेवटी त्याला आपला जीव वाचवण्यासाठी बेशुद्ध होण्याचं नाटक करावं लागलं. पण तरी त्याची सुटका झाली नाही. त्याच्यासोबत असं काही घडलं, ज्याचा कुणीच विचार केला नसेल. चित्त्याने साधला डाव! कुनोच्या जंगलातून बाहेर पडत गावात घुसला आणि…; काय घडलं पाहा VIDEO लेटेस्ट साईटिंग्स नावाच्या यूट्यूब चॅनलवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.
तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला, ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.