हत्तीला घाबरून पळाली सिंहिण
नवी दिल्ली 15 जुलै : जंगलाचा एक नियम आहे, तिथे फक्त बलवान प्राणीच राज्य करतात. म्हणूनच सिंहाला जंगलाचा राजा म्हटलं जातं, कारण तो सर्वात भयानक शिकारींपैकी एक आहे. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की सिंहालाही एका प्राण्याची भीती वाटते. त्याच्या समोर येण्याची हिम्मत सिंह करत नाही. चुकून समोर आला तरी सिंह आपला मार्ग बदलतो. हा प्राणी म्हणजे हत्ती.
सध्या एक व्हिडिओ यूट्यूबवर Maasai Sightings नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. यामध्ये सिंहीण तिच्या 3 शावकांसह बसलेली दिसत आहे. ती त्यांच्यासोबत मस्ती करताना दिसत आहे. इतक्यात एक महाकाय हत्ती तिथे येतो. त्याला पाहून सिंहिणीची अवस्था बिकट होते. आधी ती पिल्लांसोबत कुरणात लपण्याचा प्रयत्न करते. पण हत्ती शांत बसणार नाही, हे लक्षात येताच ती सर्वात लहान पिल्लाला तोंडात दाबून तिथून पळू लागते. हत्तीही तिच्या मागे धावतो आणि तिला पळायला लावतो. हे पाहून असं वाटतं जणू तो सिंहिणीला घाबरवत आहे. Viral Video : सापाला दोरीसारखा ओढत होता चिमुकला, पाहून घरातील लोकही पळू लागले व्हिडिओसह दिलेल्या कॅप्शनमध्ये असं म्हटलं आहे, की मादी सिंहीणी आपल्या शावकांना जन्म देण्यासाठी दूर जाते आणि पिल्ले कित्येक आठवड्यांची होईपर्यंत परत येत नाहीत. मग प्रौढ मादी पिल्लांचं संगोपन आणि संरक्षण करण्यासाठी एकत्र येतात. एकटेपणाच्या या काळात, सिंहीण आणि तिची पिल्लं भक्षक, पाणघोडे, म्हैस आणि हत्ती यांसारख्या मोठ्या शिकारींपासून जपून राहातात.