JOIN US
मराठी बातम्या / Viral / एका हरणासाठी बिबट्या आणि सिंहीण झाडावरच भिडले; शेवटी फांदी तुटली अन् घडलं असं..Video

एका हरणासाठी बिबट्या आणि सिंहीण झाडावरच भिडले; शेवटी फांदी तुटली अन् घडलं असं..Video

व्हायरल व्हिडिओमध्ये एक सिंहीण झाडावर चढलेली दिसते. जिथे बिबट्या आधीच एका हरणाला मारून खात बसला होता.

जाहिरात

बिबट्या आणि सिंहिंणीची झाडावरच लढाई

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 30 जून : सिंह हा जंगलाचा राजा आहे. त्याला जंगलातील सर्वात शक्तिशाली प्राणी म्हणून ओळखलं जातं, जेव्हा हा प्राणी शिकार करायला निघतो तेव्हा इतर सर्व प्राणी घाबरून पळून जातात. पण सिंहाबाबतची एक गोष्ट तुम्हाला माहिती असेल. ती म्हणजेच, सिंह स्वतः शिकार करताना फार क्वचितच पाहायला मिळतात. एकतर सिंहिणी शिकार करतात किंवा इतर प्राण्यांनी केलेली शिकार सिंह हिसकावून घेतात. मात्र जेव्हा ते शिकारीसाठी भिडतात तेव्हा ते दृश्य पाहण्यासारखे असते. अशाच एका घटनेचा व्हिडिओ व्हायरलल झाला आहे. ज्यामध्ये एक सिंहिण बिबट्याने केलेली शिकार हिसकवण्याचा प्रयत्न करताना दिसते. हरणाच्या पिल्लावर हल्ला करण्याच्या तयारीत होती मगर; हत्तीने असा वाचवला जीव..पाहा VIDEO @wild.animalpower नावाच्या Instagram अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला गेला आहे. या व्हिडिओमध्ये सिंहीण आणि बिबट्या यांच्यात लढाई पाहायला मिळत आहे. सिंहीण शिकार करण्यात वेगवान असते, तर सिंह सिंहिणींनी केलेली शिकारच खातात. मात्र या व्हिडिओमध्ये सिंहीण बिबट्याकडून मृत हरण हिसकावून घेत असल्याचं दिसत आहे.

संबंधित बातम्या

व्हायरल व्हिडिओमध्ये एक सिंहीण झाडावर चढलेली दिसते. जिथे बिबट्या आधीच एका हरणाला मारून खात बसला होता. हे दोघंही या हरणासाठी भिडताना दिसतात. मात्र, जेव्हा झाडाची फांदी तुटते आणि दोघेही जोरात जमिनीवर पडतात तेव्हा सिंहीण आणि बिबट्यामध्ये भांडण सुरू होतं. या लढाईत बिबट्या मांस सोडून पळून जातो आणि सिंहीण तिथेच बसून राहते. पडल्यामुळे तिला दुखापत झाली असावी, पण मांस शेवटी तिलाच मिळतं. व्हिडिओला 48 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत तर अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने म्हटलं की, बिबट्या जमिनीवर पडताच पळू लागला. दुसऱ्याने म्हटलं, की त्याला हा चित्ता दिसत आहे, बिबट्या नाही. तिसऱ्याने म्हटलं की, बिबट्या इतक्या वेगाने पळाला की सिंहिणीला तो कुठे गेला ते कळलेच नाही. तर एका व्यक्तीने म्हटलं, की एका हरणासाठी एवढी लढाई! इतरही अनेकांनी यावर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या