नवी दिल्ली 30 जून : हत्तीला अतिशय शांत आणि बलाढ्य प्राणी म्हणून ओळखलं जातं. मात्र, जेव्हा तो चवातळतो तेव्हा कोणीच त्याच्यासमोर उभा राहू शकत नाही. त्यामुळेच जंगलात त्यांना तोंड देण्यास कोणीही धजावत नाही. त्यांच्या प्रचंड आकारमानामुळे आणि सामर्थ्यामुळे सिंह आणि वाघांसारखे शिकारी मांसाहारी प्राणीही त्यांचा सामना करणं टाळतात. मात्र हे हत्ती खूप दयाळूही असतात आणि अनेकदा ते गरजू प्राण्यांना मदत करतानाही दिसतात. असाच एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरीही हत्तीचं कौतुक करत आहेत. मालकासाठी श्वानाने जे केलं ते पाहून नेटकरी झाले अवाक; तुफान व्हायरल होतोय हा VIDEO या व्हिडिओ मध्ये हत्ती एक मगरीच्या तावडीतून हरणाच्या पिल्लाला वाचवताना दिसतो. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एका तलावाजवळ हत्तींचा कळप उभा आहे. त्याचवेळी, एक हत्तीचं पिल्लू मगरीच्या तावडीतून स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करताना दिसतं. मगर हरणाच्या पिल्लाला मारणारच होती पण तेवढ्यात एका हत्तीने मगरीला जोरात लाथ मारली. यानंतर संधी मिळताच हरणाच्या पिल्लाने लगेच पाण्यातून बाहेर येत सुरक्षित ठिकाणी उडी घेतली.
If they can be compassionate,
— Susanta Nanda (@susantananda3) June 22, 2023
Why can’t we☺️ pic.twitter.com/okj8h9wxaB
हत्ती तिथेच थांबला नाही. तर तो मगरीला लाथ मारत राहिला. भारतीय वन सेवा (IFS) अधिकारी सुशांत नंदा यांनी कॅप्शनसह व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, की जर ते दयाळू असू शकतात, तर आपण का नाही? हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये हत्तीने हरणाच्या पिल्लाचे प्राण कसे वाचवले हे तुम्ही पाहू शकता. IFS अधिकाऱ्याने हा व्हिडिओ शेअर करत लिहिलं, की “आम्हा मानवांना माहिती आहे की, कसं/कोणाचा/का/कुठे, कधी द्वेष करायचा. मात्र प्राण्यांना हे चांगलंच माहित आहे.” या व्हिडिओला प्रचंड व्ह्यूज मिळाले असून व्हिडिओ नेटकऱ्यांची मनं जिंकत आहे. अनेकांनी हत्तीच्या या कामाचं कौतुक केलं आहे.