सिंहाचा म्हशीवर हल्ला. (फोटो - युट्यूब व्हिडीओ ग्रॅब)
नवी दिल्ली, 12 जुलै : सिंहाला जंगलाचा राजा म्हटलं जातं. कधी कधी या राजालाही हार मानावी लागते. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. एका म्हशीला एकटं पाहताच सिंह तिच्यावर धावून आला, त्याने म्हशीवर झडप घातली. पण तिच्यावर हल्ला केल्यानंतर पुढे जे घडलं त्यामुळे जंगलाचा राजाही घाबरला. म्हशीची शिकार करायला आलेला सिंहच जीव मुठीत धरून पळाला. सिंह आणि म्हशीचा हा व्हिडीओ चर्चेत आला आहे. एक म्हैस एकटी होती. तिला पाहताच सिंह तिची शिकार करायला गेला. म्हैस सिंहाच्या तावडीत सापडलीसुद्धा. सिंह म्हशीचे लचके तोडायला लागला. म्हैस वेदनेने ओरडत होती. ती अशा पद्धतीने जमिनीवर आडवी पडली होती ती तिला वाचण्यासाठीही धडपड करता येत नव्हती. उठता येत नव्हतं. मदतीसाठी ती आवाज देत होती.
अखेर तिच्या साथीदारांनी तिची हाक ऐकली. तिचे साथीदार तिच्या मदतीसाठी धावून आले. उजव्या बाजून आणखी दोन म्हशी येताना दिसतात. त्यापैकी पहिली म्हैस सिंह शिकार करत असलेल्या म्हशीच्या डोक्यावर मारताना दिसतो. तिच्या डोक्यावर आपलं डोकं मारून तिला उठवण्याचा प्रयत्न करतो. अखेर म्हैस उठते. त्याचवेळी सिंह हादरतो. शिकार करायला आलेला वाघ झाला कन्फ्युझ; शिकारीचा हा VIDEO पाहून आवरणार नाही हसू आता आपलं काही खरं नाही हे सिंहालाही कळून चुकतं. म्हणून शिकार केलेली म्हैस उठून उभी राहताच सिंह क्षणभरही तिथं थांबत नाही. तो तिथून लगेच पळ काढतो. म्हैस उठते आणि जाते. नंतर सिंह पुन्हा तिच्यामागे जातो. तर दुसरी म्हैसही सिंहाचा पाठलगा करत जाते. तिसरी म्हैस मात्र आली त्या दिशेने पुन्हा तिथून निघून जाते. व्हिडिओमध्ये दिलेल्या माहितीनुसार म्हशींचा कळप नेहमी एकत्र फिरतो. परंतु जेव्हा एखादा शिकारी त्यांच्यावर हल्ला करतो तेव्हा ते भक्षकाला गोंधळात टाकण्यासाठी लहान गटांमध्ये वेगळे होतात. त्यामुळे सिंहांना त्यांची शिकार करणं कठीण होतं. म्हशी त्यांच्या कळपाचाउपयोग सिंहांवर हल्ला करण्यासाठी आणि त्यांना मारण्यासाठी करतात. म्हैस ही सर्वात मोठी शिकार नाही ज्याचा पाठलाग करण्यासाठी सिंह ओळखले जातात, परंतु यामुळे ते कमी प्राणघातक होत नाहीत. Viral Video : मस्करीची झाली कुस्करी, भुकेनं व्याकूळ मगरीसमोर मित्राला फेकलं आणि… Maasai Sightings यूट्यूबवर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
या व्हिडीओवर बऱ्याच कमेंट येत आहेत. तुमचीही यावरील प्रतिक्रिया आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.