जाहिरात
मराठी बातम्या / Viral / शिकार करायला आलेला वाघ झाला कन्फ्युझ; शिकारीचा हा VIDEO पाहून आवरणार नाही हसू

शिकार करायला आलेला वाघ झाला कन्फ्युझ; शिकारीचा हा VIDEO पाहून आवरणार नाही हसू

वाघ आणि बदकाचा व्हिडीओ (फोटो - इन्स्टाग्राम व्हिडीओ ग्रॅब)

वाघ आणि बदकाचा व्हिडीओ (फोटो - इन्स्टाग्राम व्हिडीओ ग्रॅब)

शिकारीसाठी आलेल्या वाघाचा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

नवी दिल्ली, 09 जुलै : शिकारीचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. असे कितीतरी व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. पण हे व्हिडीओ थरारक, अंगावर काटा आणणारे, धडकी भरवणारे असतात. पण शिकारीचा कधी मजेशीर व्हिडीओ तुम्ही पाहिला आहे का? शिकार आणि तीसुद्धा मजेशीर असं कसं काय असू शकतं, असं तुम्ही म्हणाल. पण शिकारीला आलेल्या या वाघाचा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हाला हसू आवरणार नाही. शिकार करायला आलेल्या वाघाची चांगलीच फजिती झाली आहे. शिकाऱ्याने अशी काही गुगली टाकली ही वाघही कन्फ्युझ झाला. नेमकं काय झालं, कसं झालं हे त्यालाही समजेना. अगदी गप्पपणे तो शिकारीला आला. पण शिकाऱ्याने त्यालाच मोठा शॉक दिला. खतरनाक वाघाचा चेहरा अक्षरशः मांजरीसारखा झाला. जो पाहून तुम्ही पोट धरून हसाल. व्हिडीओत पाहू शकता एका तलावात एक बदक पोहोताना दिसतो आहे. समोरून एक वाघ येतो. पाण्यात पोहोत पोहोत वाघ बदकाच्या दिशेने येतो. बदकापासून काही अंतरावर तो पोहोचलेला असतो. आता शिकार आपल्या तावडीत सापडणार असं वाघाला वाटतं. आपल्या दिशेने येणाऱ्या संकटाकडे बदकाचंही लक्ष नाही. त्यामुळे आता बदक वाघाच्या जबड्यात जातो की काय, अशी भीती आपल्यालाही वाटते. पण काही क्षणातच डाव पलटतो. ऑक्टोपसने पळवला कॅमेरा, खोल पाण्यात नेला अन्…, पुढे जे घडलं ते अविश्वसनीय; VIDEO VIRAL पुढे तुम्ही पाहाल तर बदक अचानक पाण्यात जातो. वाघाच्या डोळ्यादेखत त्याची शिकार गायब होते. वाघही एकटक पाहत राहतो. पण बदक काही पुन्हा पाण्याबाहेर येत नाही आणि वाघाला दिसत नाही. पाण्याच्या आत जाऊन बदक तिथून पुढे निघून गेला. शक्तीने नव्हे तर युक्तीने त्याने वाघापासून आपला जीव वाचवला आहे. यानंतर वाघाचा चेहरा मात्र पाहण्यासारखा आहे. मांजराच्या हातून उंदीर सुटून मांजराची जशी अवस्था होते, तशीच अवस्था या खतरनाक वाघाची झाली आहे. बदक कुठे गेला, हे वाघ शोधत राहतो. इवल्याशा बदकामुळे खतरनाक वाघालाही फुटला घाम; हा VIDEO एकदा पाहाच @naturelife_ok इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.

जाहिरात

तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला. तुमची यावरील प्रतिक्रिया आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात