18 लाखांच्या पॅकेजची नोकरी सोडून तरुणाने सुरू केला स्टार्टअप, महाराष्ट्रानंतर आता बिहारमध्येही मिळणार उसाची आईस्क्रीम
बेगूसराय, 10 जून : देशात जेव्हापासून आत्मनिर्भर भारताची मोहीम सुरु झाली आहे, तेव्हापासून अनेक युवा नोकरी करण्याऐवजी व्यवसाय करून रोजगार निर्माण करणारे झाले आहेत. अनेक युवा चांगल्या पॅकेजची नोकरी सोडून स्वतःचा स्टार्टअप व्यवसाय सुरु करीत आहेत. ज्यातून ते बराच नफा देखील मिळवत आहेत. आजच्या युगात कोणतेही काम छोटे अथवा मोठे नसते, हे तरुणांना आता समजू लागले आहे. बेगुसरायच्या रतनपूर गावातील गौरव कुमार नावाच्या युवकाने 2012 मध्ये जयपूर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये एमबीएचा अभ्यास सुरू केला. 2014 मध्ये त्याचा अभ्यास पूर्ण झाल्यावर त्याने इंटरनॅशनल कंपनीमध्ये 8 वर्ष नोकरीचा अनुभव घेतला. तर २०२२ मध्ये स्वतःचा स्टार्टअप व्यवसाय सुरु करण्याच्या उद्देशाने त्याने 18 लाखच पॅकेज असणारी नोकरी सोडली आणि काही मित्रांसोबत उसाच्या रसापासून तयार झालेल्या आईस्क्रीमचा व्यवसाय सुरु केला. आता त्यांच्या आईस्क्रीमचा ’ ओक फ्रेश’ हा ब्रँड शहरात लोकप्रिय झाला असून यातून त्याची चांगली कमाई देखील होत आहे. Hanuman Chalisa : का वाचावी हनुमान चालीसा? काशीतील पंडितांनी सांगितले पाच फायदे 40 औषधी वनस्पतींच्या मिश्रणाने तयार केली जाते उसाची आईस्क्रीम : बेगुसराय जिल्ह्यातील रतनपूर येथील रहिवासी असलेल्या गौरव कुमारने सांगितले की, तो 18 लाखांच्या वार्षिक पॅकेजवर दिल्ली, कोलकाता सारख्या मोठ्या शहरांमध्ये काम करत होता. 8 वर्षे सतत काम केल्यानंतर मी माझा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. नुकतीच नोकरी सोडून गावी परतलो. आता काही स्थानिक मित्रांसोबत उसाच्या रसाचे आईस्क्रीम बनवण्याचा व्यवसाय सुरु केला आहे. या प्रक्रियेत शेतकऱ्यांकडून थेट ऊस खरेदी करून त्यांना चांगला भावही दिला जात आहे. गौरवच्या सहकाऱ्याने सांगितले की, उसाच्या रसापासून आईस्क्रीम बनवण्यासाठी 4 तास लागतात. प्रथम मशिनमधून उसाचा रस काढला जातो, मग त्या आइस्क्रीमच्या फ्रेममध्ये 40 औषधी वनस्पतींचा मसाला आणि लिंबू मिसळून त्याला गोठवण्यासाठी ठेवले जाते. ही आईस्क्रीम नैसर्गिक गोष्टींपासून बनवण्यात आली असल्याने लोकांच्या पसंतीस उतरत असून चांगला प्रतिसादही मिळत आहे.
एकूण विक्रीच्या 20 टक्के कमाई : गौरव कुमार त्याच्या 8 सहकाऱ्यांसह 4 चार आउटलेट चालवत आहेत. लवकरच पाचवे आउटलेटही सुरू होणार आहे. एका आईस्क्रीमची किंमत 10 रुपये असून महाराष्ट्रानंतर फक्त बेगुसरायमध्ये हे उसाचे आईस्क्रीम सध्या उपलब्ध आहे . उसाच्या आईस्क्रीमचा आस्वाद घेताना सुमित कुमार म्हणाले की उन्हाळ्यात यापेक्षा चांगले काहीही असू शकत नाही. प्रत्येक आउटलेटमधून दररोज सुमारे 150 आइस्क्रीमची विक्री केली जाते. त्याचबरोबर एका स्टॉलवर सुमारे 1500 आईस्क्रीमची विक्री होत असते. यापैकी 20% निव्वळ उत्पन्न आहे.