वाराणसी, 10 जून : हनुमान हे भगवान शंकराचा रुद्र अवतार समजले जातात त्यामुळे सर्वजण हनुमानाची पूजा करण्यासोबतच हनुमान चालीसाचे देखील पठण करतात. हनुमान चालिसाचे नियमित पठण केल्याने जीवनातील संकटे दूर होतात, अशी श्रद्धा आहे. परंतु नियमितपणे हनुमान चालिसाचे पठण करण्याचे इतरही अनेक फायदे आहेत. काशीचे विद्वान पंडित संजय उपाध्याय यांच्या म्हणण्यानुसार हनुमान चालिसा पठणाचे अनेक चमत्कारी फायदे आहेत. ज्यांच्याबद्दल फार कमी लोकांना माहिती असून रोज हनुमान चालिसाचे पठण करणाऱ्यांना हनुमंताचा कसा आशीर्वाद मिळतो ते जाणून घेऊयात. हनुमान चालीसा वाचण्याचे 5 फायदे : 1. बजरंगबली हनुमान केवळ संकटमोचनच नाहीत तर बुद्धी आणि ज्ञान देखील देतात. अशा स्थितीत जो व्यक्ती दररोज हनुमानाचे स्मरण करून हनुमान चालिसाचे पठण करतो, त्याच्यावर माता सरस्वतीचा आशीर्वाद होतो आणि त्याची बुद्धीही वाढते. काय सांगता? चक्क नाकाने वाजवतात बासरी…तीही अगदी मधुर 2. रामाचा भक्त असलेल्या हनुमानाला संकटमोचन असे ही म्हणतात, अशी श्रद्धा आहे की जो त्याची नियमित पूजा करतो आणि हनुमान चालिसाचा पाठ करतो त्याच्यावर कोणत्याही वाईट आणि नकारात्मक शक्तीचा प्रभाव पडत नाही. 3. याशिवाय हनुमान चालिसाचे पठण केल्याने शनीच्या त्रासापासून मुक्ती मिळते. अशा परिस्थितीत जे लोक शनीची साडेसाती किंवा धैय्याच्या त्रासाने पीडित आहेत त्यांनी नियमितपणे हनुमान चालिसाचे पठण करावे.
4. याशिवाय हनुमान चालिसाचे पठण केल्याने जीवनातील सर्व अडथळे आणि संकट नष्ट होतात. म्हणूनच दररोज हनुमान चालिसाचे पठण केले पाहिजे. 5. हनुमान चालिसाचे पठण केल्याने मनातील सर्व विकार दूर होतात आणि मन स्थिर होते.