वॉशिंगमध्ये सोला लसूण (फोटो - युट्यूब व्हिडीओ ग्रॅब)
नवी दिल्ली, 09 जून : स्वयंपाक करताना सर्वात कंटाळवाणं आणि वेळ लागणारं काम कोणतं विचारलं तर कुणीही सांगेल ते म्हणजे लसूण सोलण्याचं. लसणीच्या कांद्यापासून एकएक पाकळी वेगळी करून त्याची साल काढणं म्हणजे खूपच त्रासदायक. लसूण सोलण्यात वेळही जातो आणि कंटाळाही येतो. पण तुमचं हे मिनिटांचं काम अवघ्या काही तासात होईल. तुमची कपडे धुणारी मशीन तुमची लसूणही सोलून देईल. या जबरदस्त किचन जुगाडा चा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. लसूण सोलण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे. अगदी सहजसोप्या पद्धतीने लसूण सोलण्यासाठी प्रत्येक जण वेगळी ट्रिक वापरतो. पण तुम्ही कधी वॉशिंग मशीनमध्ये लसूण सोलून पाहिला आहे का? एका गृहिणीने हा जबरदस्त जुगाड दाखवला आहे. गृहिणींकडे असे कित्येक घरगुती जुगाड असतात. काही गृहिणी ते सोशल मीडियावर शेअर करतात. अशाच एका गृहिणीने शेअर केलेला हा वॉशिंग मशीनमध्ये लसूण सोलण्याचा जुगाड.
आता वॉशिंग मशीनमध्ये लसूण कशी सोलायची ते पाहुयात. Kitchen Jugaad Video - बस्सं फक्त एका ग्लासने टॉयलेटमध्ये केली ‘जादू’; तुमची नजरच हटणार नाही तुम्हाला जितकी लसूण लागणार आहे तितकी लसूण घ्या. लसणीच्या पाकळ्या वेगळ्या करा आणि ही लसूण 15-20 मिनिटं थंड पाण्यात टाकून ठेवा. आता कॉटन बॅग किंवा सुती कापड घ्या. त्यात भिजवलेला लसूण ठेवून त्यात गुंडाळून घ्या. आता लसूण गुंडाळलेलं हे कापड वॉशिंग मशीनच्या ड्रायरमध्ये टाका. झाकण लावून 2 ते 5 सेकंद फिरवून घ्या. आता वॉशिंग मशीनमधील लसूण ठेवलेलं कापड बाहेर काढा आणि उघडून पाहा. लसणीच्या साली निघालेल्या दिसतील. पण तरी त्यातील एक एक लसूण निवडून काढणंही शक्य नाही. त्यामुळे पुन्हा ही लसूण सालीसह पाण्यात टाका. साली हलक्या असल्याने त्या पाण्याच्या वर तरंगतील तर लसूण पाण्याच्या तळाशी राहिल. वर्दान पक्वान युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. Kitchen Jugaad : किचन सिंकऐवजी कुकरमध्ये टाका भांडी, हात न लावताच चकाचक होतील; कसं ते पाहा VIDEO अगदी कमीत कमी वेळेत लसूण सोलण्याची ही सोपी पद्धत आहे. तुम्ही हा जुगाड करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
(सूचना - हा लेख सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत याची हमी देत नाही.)