नवी दिल्ली, 08 जून : आतापर्यंत तुम्ही ग्लासचा वापर कशासाठी केलात, पाणी, ज्युस, चहा पिण्यासाठी… पण कधी या ग्लासचा वापर टॉयलेटमध्ये करून पाहिला आहे का? तुम्हाला आश्चर्य वाटेल पण ग्लास वापरून तुम्ही टॉयलेट स्वच्छ करू शकता. ग्लासने टॉयलेट असं स्वच्छ होईल की ते नव्यासारखं चमकू लागेल. परिणाम इतका जबरदस्त की तुमची नजरच या टॉयलेटवरून हटणार नाही. या जबरदस्त किचन जुगाड चा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. बऱ्याच गृहिणींकडे काही ना काही घरगुती जुगाड किंवा किचन टिप्स असतात. काही गृहिणी हा जुगाड सोशल मीडियावर पोस्ट करतात. अशाच एका गृहिणीने सांगितलेला हा जुगाड. ज्यात तिने ग्लासने टॉयलेट स्वच्छ करण्याची पद्धत दाखवली आहे. आता ग्लासने टॉयलेट स्वच्छ कसं करायचं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
गृहिणीने व्हिडीओत याची सविस्तर माहिती देत प्रात्यक्षिकही करून दाखवलं आहे. Kitchen Jugaad : किचन सिंकऐवजी कुकरमध्ये टाका भांडी, हात न लावताच चकाचक होतील; कसं ते पाहा VIDEO तिने व्हिडीओ सांगितल्यानुसार तुम्हाला एक ग्लास घ्यायचा आहे. यात व्हाइट किंवा अॅपल व्हिनेगर घ्यायचं आहे. यात सोडा मिक्स करा. त्यात बबल्स येतील. यानंतर या ग्लासात तयार झालेलं सोल्युशन टॉयलेटमध्ये पसरवा, टॉयलेटमध्ये टाका. थोडा वेळा हे सोल्युशन टॉयलेटमध्ये असंच राहू देत. यानंतर तुम्ही पाणी आणि ब्रशच्या सहाय्याने किंवा फक्त पाण्यानेही टॉयलेट स्वच्छ करून घेतलं तरी चालेल. आता याचा फायदा काय, तर तुमचं टॉयलेट अगदी नव्यासारखं चमकेल. टॉयलेटमधून दुर्गंधीही येणार नाही. टॉयलेटमधील जर्म्सही नष्ट होतील. सामान्यपणे टॉयलेट क्लिन करण्यासाठी आपण हार्पिकसारखे क्लिनर वापरतो. पण एखाद वेळी तुमच्याकडे हार्पिक नसेल, ते संपलं असेल, तुम्ही आणायला विसरला असाल तर तुम्ही हा जुगाड करू शकता. हार्पिक आणि ब्रश न वापरता तुम्ही अशा पद्धतीने टॉयलेट स्वच्छ करू शकता. Kitchen Jugaad : तुमच्या घरातील टॉयलेटला टिकली नक्की लावा; फायदा काय VIDEO मध्ये पाहा अविका रावत फुड्स युट्यूब अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही अशा पद्धतीने टॉयलेट क्लिन करून पाहा आणि त्याचा परिणाम कसा वाटला ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा.
(सूचना - हा लेख सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओवर आधारित आहेत. न्यूज 18 लोकमतचा याच्याशी संबंध नाही. न्यूज 18 लोकमत याची हमी देत नाही.)