JOIN US
मराठी बातम्या / Viral / OMG! तरूणाने चक्क बाटलीतून पाजले किंग कोब्राला पाणी, Video व्हायरल

OMG! तरूणाने चक्क बाटलीतून पाजले किंग कोब्राला पाणी, Video व्हायरल

हा व्हिडीओ छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात आहे, येथे दोन कोब्रा सापांना बाटलीतून पाणी पाजल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : नुसतं सापाचं नाव जरी घेतलं तरी लोक लांब पळतात. त्यात किंग कोब्राबद्दल तर बोलायलाच नको. कारण काही साप इतके धोकादायक असतात की त्यांनी दंश करताच माणसाचा जागीच जीव जाऊ शकतो. तसेच काही वेळा लोक घाबरुन साप आपल्या परिसरात दिसला तरी त्याला मारतात. पण सध्या सापाशी संबंधीत एक असा व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. हा व्हिडीओ छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात आहे, येथे दोन कोब्रा सापांना बाटलीतून पाणी पाजल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. सर्प प्रजातीचे हे दोन्ही साप अतिशय संतप्त झालेले दिसतात. पण, स्नेक रेस्क्यूअर त्यांना अगदी आरामात पाणी देत ​​आहे. असा व्हिडीओ फार कमी वेळा पाहायला मिळतो, ज्यामुळे लोकांना धक्का बसला आहे. वानराने लावले माकडाच्या कानशिलात, पुढे जे घडलं ते… पाहा Video उन्हाळा आला की माणसांसोबत वन्य प्राणीही पाण्याच्या शोधात इकडे तिकडे भटकायला लागतात. व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, एक व्यक्ती दोन कोब्रा सापांना बाटलीतून पाणी आणत आहे.

हा व्हिडीओ कोरबा जिल्ह्यातील आहे. वन्यजीव बचाव पथकाचे प्रमुख, वनविभागाचे सदस्य जितेंद्र सारथी हे वाचवलेल्या सापांना जंगलात सोडण्यासाठी गेले होते.

जितेंद्र सारथी यांनी सांगितले की, कोब्रा डब्यातून बाहेर काढताच तो फना पसरून खाली बसला. यानंतर त्यांनी या दोन्ही विषारी सापांना एक एक करून पाणी दिले. हा क्षण खूप खास होता. दोन्ही साप अतिशय आरामात पाणी पिऊन जंगलात गायब झाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या