किंग कोब्रा साप रेस्क्यू व्हिडीओ.
मुंबई, 06 मे : सापाच्या रेस्क्यूचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. एका कारमध्ये खतरनाक असा किंग कोब्रा साप लपून बसला होता. त्याला खेचून कारमधून बाहेर काढण्यात आलं. पण त्यानंतर जे घडलं ते थरकाप उडवणारं आहे. किंग कोब्राला सापाला पकडणाऱ्याला चांगलाच घाम फुटला. किंग कोब्रा हा जगातील सर्वात खतरनाक सापांपैकी एक. ज्याचं विष इतकं खतरनाक असतं की तो चावला तरी काही क्षणात माणसाचा जीव जाऊ शकतो. हा साप आकारानेही खूप मोठा असतो. आता या व्हिडीओतच कारमध्ये घुसलेला हा किंग कोब्रा तुम्ही पाहिला तर तुमच्या अंगावर अक्षरसः काटाच येईल. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता काळ्या रंगाचा हा भलामोठा किंग कोब्रा. एका व्यक्तीने हातात हुक असलेली काठी घेतली आहे आणि एका हातात इतक्या मोठ्या सापाला धरलं आहे. साप त्या व्यक्तीपासून दूर पळण्याचा प्रयत्न करतो आहे. मध्ये मध्ये तो त्या व्यक्तीवर हल्ला करण्याचाही प्रयत्न करतो. पण व्यक्तीने अत्यंत हुशारीने त्याला पकडलं आहे. ज्यामुळे सापाचं तोंड त्या व्यक्तीपर्यंत पोहोचत नाही आहे. त्यामुळे तो त्या व्यक्तीला दंश करू शकला नाही. बापरे बाप! घरात घुसला असा दुर्मिळ साप, मालकाची हवा टाईट; PHOTO पाहूनच डोळे पांढरे होतील त्यानंतर भिंतीच्या कडेला एक काळ्या रंगाची लांब कापडी पिशवी ठेवली आहे, त्या पिशवीचं तोंड उघडं आहे. साप स्वतःला वाचवण्यासाठी या पिशवीत घुसतो. खरंतर सापाला पकडण्यासाठीच ही पिशवी अशी ठेवली होती. साप त्याच्या आत गेला आणि अखेर हा थरार संपला. व्हिडीओत दिलेल्या माहितीनुसार हा साप एका कारमध्ये लपला होता. त्याला कारमधून बाहेर काढलं. बाहेर येताच तो पळू लागला. त्याला सर्पमित्राने कसंबसं पकडलं. पण त्याला पकडताना पकडता त्याची चांगलीच दमछाक झाल्याचं या व्हिडीओत दिसतं. भारतीय वन सेवा अधिकारी सुशांत नंदा यांनी आपल्या सोशल मीडियावर सापाचा हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. @susantananda3 ट्विटर अकाऊंटवर त्यांनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे. अरेच्चा! सापही माणसांसारखं असं काही करतो? सापाचा आश्चर्यचकीत करणारा VIDEO ट्विटरमध्ये सुशांत नंदा म्हणाले, किंग कोब्रा अन्नसाखळीत खूप महत्त्वाचे आहेत आणि ते निसर्गाचा समतोल राखण्यासाठीही उपयुक्त आहेत. या व्हिडिओमध्ये 15 फूट लांबीचा किंग कोब्रा दिसत आहे, ज्याची सुटका केली जात आहे. त्यानंतर त्यांना जंगलात सोडलं जातं.
पावसाळ्यात ते कोणत्याही ठिकाणी असू शकतात. सापांना रेस्क्यू करण्याचं काम प्रशिक्षिक लोकांनीच करावं. कृपया साप पकडण्याचा प्रयत्न करू नका. असं आवाहनही त्यांनी केलं आहे.