नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर : कौन बनेगा करोडपतीचा (KBC) 12 वा हंगाम जबरदस्त सुरू आहे. बुधवारी KBCच्या एका एपिसोडमध्ये आलेल्या स्पर्धक अनुपा दास या सात कोटी रुपयांच्या प्रश्नापर्यंत पोहचल्या. मात्र याचे उत्तर त्यांना देता आले नाही. हा सात कोटीचा प्रश्न क्रिकेटशी संबंधित होता. या प्रश्नाचे उत्तर न दिल्यामुळे अनुपा यांनी 7 कोटी गमावले. KBC12 चे होस्ट अमिताभ बच्चन यांनी अनुप यांना क्रिकेटशी संबंधित जॅकपॉट प्रश्न विचारला. अमिताभ बच्चन यांनी अनुपा यांना सात कोटीसाठी- रियाज पूनावाला आणि शौकत दुकानवाला यांनी कोणत्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये कोणत्या संघाचे प्रतिनिधित्व केले आहे?, असा प्रश्न विचारला. वाचा- इंडियन आयडॉलचा सेट झाडायचा हा स्पर्धक; तरुणाची संघर्षमय कथा
वाचा- Majha Hoshil Na: आदित्यला होणार सईबद्दलच्या भावनांची जाणीव अन्… या प्रश्नासाठी चार पर्याय होते- A. केनिया B. युएई C. कॅनडा D. इराण. अनूपला या प्रश्नाचे उत्तर माहित नव्हते, म्हणून त्याने शो सोडण्याचा निर्णय घेतला. सोडल्यानंतर अनूपा यांनी युएई असे उत्तर दिले. हे उत्तर बरोबर होते, मात्र त्यांनी शो क्विट केल्यामुळे त्या सात कोटी जिंकू शकल्या नाहीत. वाचा- Shona Shona गाणं टॉप ट्रेंडमध्ये; सिद्धार्थ-शहनाजची भन्नाट केमिस्ट्री छत्तीसगडमधील जगदलपूरहून आलेल्या अनुपा दास शाळेतील शिक्षिका आहेत आणि केबीसीमध्ये त्यांनी एक कोटी जिंकण्याची कामगिरी केली. केबीसीच्या या हंगामात करोडपती होणाऱ्या त्या तिसऱ्या स्पर्धेक ठरल्या.