मुंबई, 25 डिसेंबर : आपल्याकडे लॉकडाऊनपासून ते आतापर्यंत अनेक जुगाड केल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. जुगाड करण्याची हद्द आणि अतरंगी जुगाड काही कमी होत नाहीत. सिनेमा पाहाणं कुणाला आवडत नाही. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारा सिनेमा जेव्हा पाहण्यासाठी पांढऱ्या स्क्रिनचा जुगाड करावा लागतो तेव्हा गावांमध्ये खूप मोठा प्रश्न निर्माण होतो. हा सिनेमा पाहण्यासाठी गावात एक भन्नाट जुगाड करण्यात आला आहे. एका पठ्ठ्यानं डोकं लढवत चक्क गायीलाच उभं केलं आणि तिच्या पोटाचा टीव्ही स्क्रिनसारखा वापर करून सिनेमा लावल्याचा हा अजब आणि मजेशीर जुगाड सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे.
हे वाचा- अरेरे! काय ही अवस्था; जान्हवी कपूरने शेअर केला आपला MOOD 2020 या फोटोमध्ये आपण पाहू शकता की पांढऱ्या रंगाच्या गायीच्या पोटाचा वापर टीव्ही स्क्रिनसारखा करण्यात आला आहे. या गायीला आडवं उभं करून तिच्या पोटावर प्रोजेक्टरच्या मदतीनं सिनेमा लावला आहे. अख्खा गाव हा सिनेमा पाहण्यासाठी जमलं आहे. सर्वांना पडलेला प्रश्न म्हणजे ती गाय पण एवढा वेळ कशी स्वस्थ उभी राहिली असेल? असा भन्नाट जुगाड आतापर्यंत तरी कधी पाहण्यात आला नसेल. IPS ऑफिसर दिपांशू काब्रा यांनी हा फोटो ट्वीट केला आहे. आतापर्यंत हा फोटो 500 हून अधिक लोकांनी पाहिला असून 450 हून अधिक लोकांनी लाईक केला आहे. हा फोटो नेमका कोणत्या भागातला आहे हे समजू शकलं नाही मात्र सोशल मीडियावर या अजब जुगाडाची चर्चा मात्र जोरदार रंगली आहे.