Home /News /lifestyle /

अरेरे! काय ही अवस्था; जान्हवी कपूरने शेअर केला आपला MOOD 2020

अरेरे! काय ही अवस्था; जान्हवी कपूरने शेअर केला आपला MOOD 2020

2020 हे वर्ष तसं कुणासाठीच चांगलं ठरलं नाही. जान्हवी कपूरने (Janhvi Kapoor) आपलं हे वर्ष नेमकं कसं गेलं हे एका फोटोतून दाखवलं आहे.

मुंबई, 24 डिसेंबर : जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) कायमच सोशल मीडियावर (Social Media) अ‍ॅक्टिव्ह असते. इन्स्टाग्रामवर (Instagram) तिचे 1 कोटींच्या जवळपास फॉलोअर्स (Followers) आहेत. जान्हवी तिच्या आयुष्यातील प्रत्येक अपडेट  सोशल मीडिया पेज वरून देताना दिसते. जान्हवीने काही दिवसांपूर्वीच 2020 मध्ये स्वतःला कसं बिझी ठेवलं याचा फोटो तिच्या  इन्स्टाग्राम (Instagram) अकाउंटवर शेअर केला होता. त्यानंतर आता तिने पुन्हा तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये (Instagram Story) फोटो शेअर केला असून याला "2020 mood"असं कॅप्टन  दिलं आहे. जान्हवीने शेअर केलेल्या या  फोटोमध्ये ती पायऱ्यांवर बसलेली असून तिने केशरी रंगाचा घागरा घातला आहे. या फोटोत जान्हवी नाराज दिसून येत आहे. तसंच हा फोटो कुठल्या तरी शूटिंग लोकेशनवरील आहे. यापूर्वी शेअर केलेल्या एका फोटोत जान्हवी  शांतपणे कॅमेऱ्याला पोज देत आहे तर दुसऱ्या फोटोत हे सर्व कधी संपणार याची ती वाट पाहताना दिसून येत आहे. यावर्षी जान्हवीचा एकच चित्रपट आल्याने खऱ्या अर्थाने हे वर्ष तिच्यासाठी फोटोप्रमाणेच चिंताग्रस्त गेलं आहे. जान्हवीचा हा असा फोटोही तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. या फोटोवर तिच्या चाहत्यांनी लाईक्स (Likes) आणि कमेंट्सचा (Comments) पाऊस पडला आहे. हे वाचा - 'Mission Majnu' मधून रश्मिका मंदानाची बॉलिवूडमध्ये एण्ट्री; आहे तरी कोण ही साऊथ जान्हवी कपूर(Janhavi Kapoor) सध्या अनेक चित्रपटांचं चित्रीकरण करत आहे. त्यात  'तख्त', 'बॉम्बे गर्ल', करण जोहरचा 'दोस्ताना-2' आणि एका दाक्षिणात्य चित्रपटाचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळं आगामी काळात तिचे अनेक चित्रपट येणार आहेत. रुही अफज़ामध्ये ती राजकुमार राव(Rajkumar Rao) याच्याबरोबर दिसणार आहे तर दोस्ताना-2 मध्ये ती कार्तिक आर्यन(Kartik Aryan) आणि लक्ष ललवाणी(Laksh Lalvani) यांच्याबरोबर दिसणार आहे.
Published by:News18 Desk
First published:

Tags: Bollywood, Bollywood actress, Janhavi kapoor, Shridevi, Social media, Social media trends, Social media viral

पुढील बातम्या