व्हायरल व्हिडीओ
मुंबई : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. इथे एका मागून एक मनोरंजक व्हिडीओ व्हायरल होत असतात. जे पाहण्यात लोकांचा तासनतास वेळ कसा वाया जातो, हे त्यांचं त्यांनाच कळत नाही. येथील काही व्हिडीओ हे इतके मनोरंजक असतात की आपण आपल्या मित्रांसोबत देखील ते शेअर करतो. सध्या असाच एक व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक व्यक्ती मुद्दाम मुक्या प्राण्याची कळ काढतो. पण त्याचं कर्म त्याला तिथल्या तिथेच त्याची शिक्षा देतं, ज्यामुळे त्यासोबत पुढे जे काही घडलं, ते पाहून तुम्ही पोट धरुन हसाल.
रस्त्यात काही म्हशी उभ्या असतात, तेव्हा तेथून बाईकवरुन दोन तरुण जात असतात. या तरुणांच्या रस्त्यात जेव्हा एक म्हैस येते, तेव्हा तेथे गाडी न थांबवता, यापैकी एक तरुण म्हशीला लाथ मारतो आणि पुढच्याच क्षणी त्याचा बॅलेंस बिघडतो आणि हे दोन्ही तरुण बाईकसह खाली पडतात. वासराला वाघ पकडणार इतक्यात गायीची एन्ट्री, 10 सेकंदात पलटला संपूर्ण गेम, पाहा Video हा व्हिडीओ पाहून तुम्हाला हे नक्कीच पटेल की आपल्या कर्माचं फळ प्रत्येक व्यक्तीला मिळतं, काहींना हे तत्काळ मिळतं, तर काहींना काही दिवसांनी, पण मिळतं नक्की. त्यामुळे या व्हिडीओला एक उदाहरण म्हणून घ्या आणि चांगले कर्म करत रहा.
हा व्हिडीओ Sanjay Kumar नावाच्या व्यक्तीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओला लाखो वेळा पाहिलं गेलं आहे. लोक या व्हिडीओवर जोरदार कमेंट्स देखील करत आहेत.