मांसाच्या तुकड्यासाठी भिडले 2 बिबट्या
नवी दिल्ली 29 जुलै : जंगल ही एक अशी जागा आहे, जिथे निरनिराळे प्राणी एकमेकांशी भांडत राहतात आणि अन्न मिळवण्यासाठी आपला जीवही पणाला लावतात. सध्या अशाच एका घटनेचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये दोन बिबट्या मांसाच्या तुकड्यासाठी भांडताना दिसत आहेत. मात्र तो मांसाचा तुकडा दोघांच्या समोरून खाली पडला. यानंतर तो तुकडा हायनांच्या हाती लागला. एक बिबट्याही हायनांच्या समोर पडला होता. मात्र तो तिथून निसटला. अन्यथा त्यालाही आपला जीव गमवावा लागला असता. नुकताच हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये दोन बिबट्या एका झाडावर चढून इम्पालाच्या मांसासाठी भांडत असल्याचं दिसत आहे. त्याचवेळी हायनांची फौज झाडाखाली जमलेली दिसत आहे. वर बिबट्या मांसाच्या तुकड्यासाठी लढत होते आणि खाली हायना होते. हायना कदाचित मांसाचा तुकडा खाली पडण्याची वाट पाहत होते.
अखेर बिबट्यांच्या झुंजीत मांसाचा तुकडा झाडाखाली पडला. गंमत म्हणजे एक बिबट्याही झाडावरुन खाली पडला. बिबट्या थेट हायनाच्या टोळक्यासमोर पडतो . मात्र लगेचच जीव वाचवून तो तिथून पळून जातो. बिबट्या पळून जाताच इम्पालाच्या मांसाचा तुकडाही खाली पडतो आणि हायना त्याच्यावर तुटून पडतात. Shocking Video: 7 वर्षीय मुलीने 4 वर्षाच्या मुलाला उचलून विहिरीत टाकलं; पुढे जे केलं ते आणखीच धक्कादायक यानंतर एक बिबट्या पळून गेला आणि दुसरा बिबट्या झाडावरच राहिला. इकडे मांसाचा तुकडा हायनांच्या तावडीत सापडला. दोन्ही बिबट्यांच्या भांडणामुळे त्यांच्या काहीच हाती लागलं नाही आणि हायनाच्या टोळीने तो मांसाचा तुकडा खाल्ला. हा व्हिडीओ व्हायरल होताच लोक सोशल मीडियावर म्हणाले की, भांडणाच्या नादात बिबट्याने आपलं भक्ष्य गमावलं.