नवी दिल्ली 28 जुलै : सोशल मीडियावर सतत काही ना काही व्हायरल होत असतं. मात्र आता समोर आलेला व्हिडिओ पाहून तुमच्या अंगावरही काटा येईल. चीनमधून हा व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो तुमचा थरकाप उडवेल. या व्हिडिओमध्ये सात वर्षांची मुलगी चार वर्षांच्या मुलाला विहिरीत फेकताना दिसत आहे. हे संपूर्ण दृश्य तिथे बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं असून ते खूपच भीतीदायक आहे. खेळताना मुलं बोअरवेलमध्ये पडल्याच्या अनेक बातम्या समोर येत असतात. अनेक वेळा अशा घटनांमध्ये मुलांना वाचवून सुखरूप बाहेर काढण्यात येतं, तर काही प्रकरणांमध्ये त्यांचा मृत्यूही होतो. अनेकवेळा अशी प्रकरणंही समोर आली आहेत, ज्यामध्ये बचाव पथकाला भरपूर मेहनत घ्यावी लागते. बोअरवेलचं काम सुरू असताना झाकण उघडं राहिल्याने अनेकदा अशा प्रकारच्या घटना घडतात. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ चीनमधील युनानचा आहे. तिथल्या एका गावात लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक मुलगी एका लहान मुलाला घेऊन जाताना दिसते यानंतर ती या मुलाला 5 मीटर खोल विहिरीत फेकून देते. मुलगी त्या मुलाला उचलून विहिरीत टाकते, त्यानंतर मुलगा विहिरीच्या काठाला धरून लटकायला लागतो.
Little Girl Throws 4-Year-Old Boy Into A Well In China 😳
— Crazy Clips (@crazyclipsonly) July 26, 2023
pic.twitter.com/dW4XBbnqaI
यानंतर मुलगी त्याचे दोन्ही हात विहिरीच्या काठावरुन काढते. त्यामुळे तो खाली जातो. खाली जातात मुलाने मदतीसाठी ओरडायला सुरुवात केली, पण तिच्यावर काहीही परिणाम होत नाही. ती मुलगी थोडा वेळ विहिरीजवळ घिरट्या घालते आणि तिथून निघून जाते. मीडिया रिपोर्टनुसार, गावातील इतर लोकांनी त्या मुलाचं रडणं ऐकलं आणि त्याला विहिरीतून बाहेर काढलं. या घटनेतील मुलाचं वय 4 वर्ष असून त्याला कोणतीही मोठी दुखापत झाली नसल्याचं सांगण्यात आलं. Video : फोटोच्या नादात कपलचा जीव धोक्यात, फोटोग्राफरच्या हुशारीमुळे वाचले दोघांचे प्राण ही दोन्ही मुलं शेजारी राहात असून अनेकदा एकत्र खेळत असत. मुलाला विहिरीत टाकणाऱ्या मुलीने सांगितलं की, ती एका टीव्ही शोमध्ये पाहिलेली गोष्ट कॉपी करत होती. आतापर्यंत 13 लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. ही घटना मार्च 2023 ची आहे. हा व्हिडिओ आता पुन्हा सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर यूजर्स कमेंट करत आहेत.