नवरा-बायकोची बॉक्सिंग
मुंबई, 09 मे : नवरा-बायकोचं भांडण काही नवं नाही. कोणत्या ना कोणत्या कारणावरून पती-पत्नी मध्ये वाद होतात. आतापर्यंत तुम्ही नवरा-बायकोची घरातील भांडणं ऐकली, पाहिली असतील. पण आता घरात भांडणारे हेच पती-पत्नी चक्क बॉक्सिंगच्या रिंगमध्ये पोहोचले. एक कपल बॉक्सिंग रिंगमध्ये फाइट करताना दिसलं. नवरा-बायकोच्या बॉक्सिंगचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. तुम्ही बॉक्सिंग पाहिलंच असेल. दोन पुरुष किंवा दोन महिलांना बॉक्सिंगमध्ये भिडताना तुम्ही पाहिलं असेल. पण कधी पती-पत्नीला बॉक्सिंग रिंगमध्ये एकमेकांसमोर पाहिलं आहे का? पती बाहेर कितीही बॉस असला तरी घरातील बॉस पत्नीच असते. त्यामुळे काहीही असो बाजी जिंकते ती पत्नीच. पण जेव्हा हेच पती-पत्नी घराऐवजी बॉक्सिंगच्या रिंगमध्ये येतात तेव्हा काय होईल? असं तुम्हाला वाटतं. नवरा-बायकोचं भांडण आणि आयुष्यातून कायमचा उठला पोपट; नेमकं प्रकरण काय? व्हिडीओ तुम्ही पाहू सकता, बॉक्सिंगची रिंग दिसते आहेत. त्यात एक महिला आणि एक पुरुष दिसतो आहे. दोघांनीही हातात बॉक्सिंग ग्लोव्ह्ज घातले आहेत. पण त्यांनी एरवी बॉक्सिंगमध्ये घातले जातात तसे कपडे घातले नाही आहेत. म्हणजे सामान्य कपडेच त्यांच्या अंगावर आहेत. महिलेने काळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे आणि तिच्या पायात हाय हिल्स आहेत. तर पुरुषांनी टी-शर्ट आणि हाफ पँट घातलं आहे. सुरुवातीला महिला पुरुषावर वार करताना दिसते. पुरुष तिच्यापासून आपला बचाव करतो. त्याला मारल्यानंतर महिला इतकी आनंदी होते की ती प्रेक्षकांकडे बघून नाचू लागते. त्यावेळी पुरुष मागून येतो आणि तिला पंच मारतो. त्यानंतर तिच्यावर तो मुक्के मारत राहतो. व्हिडीओच्या शेवटी कोण जिंकतं हे दाखवण्यात आलेलं नाही. त्यामुळे नवरा-की बायकोने बाजी मारली हे आपण सांगू शकत नाही. प्री-वेडिंगमध्ये कपलला रोमँटिक पोझ दाखवताना कॅमेरामॅननी मारला चान्स; लाजिरवाण्या कृत्याचा VIDEO ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार हे दोघं पती-पत्नी आहेत. पण न्यूज 18 लोकमत याची शाश्वती देत नाही. पण जर हे पती-पत्नी असतील तर या बॉक्सिंग मॅचमध्ये कोण जिंकलं असेल असं तुम्हाला वाटतं. ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.