वॉशिंग्टन, 29 एप्रिल : पती-पत्नी चे वाद, भांडणं काही नवे नाहीत. कधी ना कधी, कोणत्या ना कोणत्या कारणावरून नवरा-बायकोची भांडणं होतातच. त्यामुळे पती-पत्नीच्या वादात कुणी पडू नये, असं म्हटलं जातं. अशाच एका दाम्पत्याच्या वादात त्यांच्या पोपटा चा जीव गेला आहे. नवरा-बायकोचं भांडण सुरू झालं आणि पोपटाचा मृत्यू झाला. पती-पत्नीच्या वादात पोपटाचा बळी गेला आहे. हे नेमकं प्रकरण काय आहे? अमेरिकेच्या फ्लोरिडातील हे धक्कादायक प्रकरण आहे. इथं राहणाऱ्या कपलच्या भांडणाची किंमत त्यांच्या पाळीव पोपटाला मोजावी लागली. सुजन्ने मुलालय आणि तिचा नवरा स्टीव दोघांमध्ये वाद झाला. त्यांचा वाद विकोपाला गेला. त्यानंतर त्यांचा पोपट आयुष्यातून कायमचा उठला.
या प्रकरणी फ्लोरिडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आलिशान कारमधून आले 2 चोर; सोनं-चांदी नव्हे तर पळवला पोपट कारण… पोलिसांच्या माहितीनुसार घटनेवेळी महिला दारू प्यायली होती. नशेत ती आपल्या नवऱ्यासोबत भांडत होती. तिचा नवराही तिच्यावर ओरडू लागला. शेजाऱ्यांनी सांगितलं की या पती-पत्नीत नेहमी भांडणं होतात. त्यांचा एकमेकांवर ओरडण्याचा आवाज त्यांच्यासाठीही सामान्य झाला होता. पण यावेळी फायरिंगचा आवाज आला. त्यानंतर त्यांनी पोलिसांना कळवलं. पोलीस घटनास्थळी गेले, तिथं त्यांना मृत पोपट दिसला. पत्नीने पतीवर पाणी फेकल्याने त्यांच्यातील वाद अधिक वाढला. पतीने पत्नीला धक्काबुक्की केली, त्यामुळे तिला खूप राग आला. संतप्त पत्नीने आपल्या हातात बंदूक घेतली आणि अंगणात पिंजऱ्यात असलेल्या पोपटावर गोळ्या झाडल्या. बंदुकीची गोळी लागताच पोपटाचा ऑन द स्पॉट मृत्यू झाला. ‘नवरा माझ्यासाठी गाणं गात नाही’, बायको पोहोचली पोलीस ठाण्यात; पुढे काय घडलं पाहा VIDEO पोलिसांनी घटनास्थळावरून बंदूकही जप्त केली. कपललाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. पोलीस ठाण्यात नेतानाही दोघं भांडत होते. सध्या दोघंही कोठडीत आहेत.