लग्नाच्या वरातीचा मजेशीर व्हिडीओ.
मुंबई, 10 फेब्रुवारी : लग्न म्हटलं घोड्यावर बसवून नवरदेवाची वाजतगाजत वरात आलीच. नवरदेवाला आपल्या पाठीवर बसवून नवरीबाईकडे अगदी थाटात घेऊन जाणारी घोडी. पण हीच घोडी नवरदेवाला त्याच्या नवरीपर्यंत पोहोचवण्याऐवजी स्वतःच त्याला घेऊन फरार झाली आहे. लग्नाच्या या अजब वरातीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. लग्नाची वरात निघताच ज्या घोडीवर नवरदेव बसला ती घोडी नवरदेवाला घेऊन पळाली. नवरदेवाचं कुटुंब, नातेवाईक आणि वऱ्हाडी सर्वजण पाहतच राहिला. खरंतर या वरातीत असं काही घडलं की त्यामुळे घोडीने नवरदेवासहच पळ काढला आहे. लग्नाचा हा व्हिडीओ पाहून तुम्ही हैराण व्हालच. पण तुम्हाला हसूही आवरणार नाही. असं या लग्नात नेमकं घडलं तरी काय पाहा. हे वाचा - अरे बापरे! नवरदेवाला झालंय तरी काय? मंडपात असं काही करू लागला की नवरीसह सर्वांना फुटला घाम नवरदेव घराबाहेर पडला आहे. घोड्यावर बसला आहे. वरात निघण्याआधी काही विधी बाकी आहेत. तेच विधी केले जात होते. नवरदेव आणि घोड्यासमोर एक खाट दिसते आहे. एक व्यक्ती ही खाट उचलते. त्याच्याखाली पाट ठेवलेला आहे. जशी खाट उचलली जाते, तसं समोर कुणीतरी फटाका फोडतो. अचानक फटाका फुटल्याने त्याचा आवाजाने घोडा घाबरतो. घोडा चवताळतो आणि तिथून पळत सुटतो. नवरदेवही त्याच्या पाठीवरच बसलेला असतो. सर्वांच्या समोरून घोडी त्या नवरदेवाला पळवून घेऊन जाते. सर्वजण फक्त ओरडतच राहतात. कुणीच काही करू शकत नाही. तुम्ही नीट पाहिलं तर एक व्यक्ती नवरदेवाला घेऊन पळणाऱ्या त्या घोड्याच्या मागेमागे धावते. पण तोपर्यंत घोडा बराच दूरपर्यंत गेलेला असतो. या नवरदेवाचं पुढे काय झालं ते माहिती नाही. पण तुम्हाला मात्र व्हिडीओ पाहताना नक्कीच मजा आली असेल.लग्नाचे बरेच व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. पण हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही पोट धरून हसला असाल. हे वाचा - घूंघट के नीचे…! लग्नानंतर नववधूला पाहताच सासरचे हादरले, नवरदेवाने उचललं टोकाचं पाऊल हा व्हिडीओ नेमका कुठला आणि कधीचा आहे माहिती नाही. घंटा नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.
तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटतं आहे किंवा लग्नातील असा एखादा मजेशीर किस्सा तुमच्याकडेही असेल तर आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.