लखनऊ, 05 फेब्रुवारी : काही समाजात लग्नाची अशी प्रथा आहे की लग्नात नवरीचा चेहरा पूर्णपणे झाकलेला असतो. लग्नानंतर नवरी जेव्हा सासरी येते तेव्हा पहिल्यांदाच सर्वजण तिचा चेहरा पाहतात. अशा एका लग्नाचं प्रकरण समोर आलं आहे. ज्यात लग्न करून वाजतगाजत सासरी आणलेल्या नववधूला पाहताच सासर हादरलं आहे. नवरदेवाने तर रागात टोकाचं पाऊलच उचललं आहे.
उत्तर प्रदेशच्या संभलमधील कटौली गावातील ही घटना. डालचंद नावाच्या तरुणाचं 26 जानेवारीला लग्न झालं. परंपरेनुसार त्याच्या नवरीच्या डोक्यावर घुंघट होता. तिचं तोंड ओढणीनं झाकलेलं होतं. नवरदेवाने नवरीच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं. भांगेत सिंदूर भरला. दोघांनी सातफेरे घेतले. लग्नाच्या सर्व विधी झालं. सर्वकाही अगदी सुरळीत लग्न पार पडलं.
हे वाचा - Wedding Video - नवरीबाईसमोरच नवरदेव असं काही बोलून गेला की, मेहुणी म्हणाली, 'लाज नाही वाटत का?'
नंतर नवरीला वाजतगाजत सासरी आणलं. नववधूची मुंह दिखाई सुरू झाली. सर्वजण नव्या वधूला पाहायला येत लागले. वरपक्षाच्या महिलांनी जसा नवरीच्या चेहऱ्यावरील घुंघट हटवला तसा त्यांना धक्काच बसला. नवरीचा चेहरा पाहून सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली. नवरदेवाने तर जीव देण्याचीच धमकी दिली.
घू्ंघट टाकून वधू पक्षाने छोट्या मुलीऐवजी मोठ्या मुलीचं लग्न लावून दिलं, असा आरोप वरपक्षाने केला आहे. मोठी मुलगी मानसिकरित्या चांगली नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. आपल्यासोबत फसवणूक झाली असं वरपक्षाने म्हटलं. तिला पुन्हा माहेरी पाठवून दिलं. यावरून दोन्ही पक्षात वादविवाद सुरू झाले. पंचायतीत हे प्रकरण गेलं. यावेळी वधू पक्षाने आपल्याकडे हुंडा मागितला गेल्याचं म्हटलं.
हे वाचा - लग्नात फोटोग्राफरने टांग दिल्याने सटकली! लेकीची पाठवणी करताच वडीलांनी उचललं मोठं पाऊल
पंचायतीतही या प्रकरणाचा निकाल लागलेला नाही. नवरदेवही संतप्त झाला आहे. आपल्याला न्याय मिळाला नाही तर आणप जीव देऊ, असा इशारा त्याने दिला आहे. माझी फसवणूक झाली आहे. जिच्याशी माझं लग्न लावून दिलं ती मानसिकरित्या कमजोर आहे.मी तिला माझ्याजवळ नाही ठेवणार. मी विष पिऊन किंवा फाशी घेऊन जीव देईन असं तो म्हणाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bridegroom, Viral, Viral videos, Wedding