बऱ्याच कुटुंबियांचा सोसायटीच्या 'या' निर्णयावर आक्षेप आहे.
आदित्य कुमार, प्रतिनिधी नोएडा, 14 जून : आपण कधी कसे कपडे घालावे, हा सर्वस्वी आपला प्रश्न असतो. कायद्याने कोणीही कोणावर असेच कपडे घाल, तसे कपडे घालू नको, अशी जबरदस्ती करू शकत नाही. अशातच नोएडाच्या एका सोसायटीने रहिवाशांच्या कपड्यांबाबत काढलेलं एक फर्मान तुफान चर्चेत आलंय. सोशल मीडियावर या सोसायटीचं पत्रक व्हायरल झालं असून नेटकऱ्यांनी त्यावर जोरदार प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. काहींनी तर या सोसायटीची तुलना थेट तालिबानशी केली आहे. त्याचं झालंय असं की, देशाची राजधानी दिल्लीच्या शेजारी असलेल्या उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडामधल्या हिमसागर अपार्टमेंटने आपल्या रहिवाशांना इमारतीच्या आवारात लुंगी आणि नाईटी घालण्यास मनाई केली आहे. शिवाय ‘इमारतीच्या आवारात फिरताना तुमच्या वागण्या-बोलण्यावर कोणाला आक्षेप घेण्याची संधी मिळू नये याकडे विशेष लक्ष द्या’, असं सोसायटीने पत्रकात म्हटलं आहे. शिवाय ‘तुमची मुलंही तुमच्याकडून शिकत असतात. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की, लुंगी आणि नाईटी घालून फिरू नये, ते घरात घालायचे पोशाख असल्याने बाहेर वापरू नये’, असं या पत्रकात लिहिलेलं आहे.
हिमसागर अपार्टमेंटमध्ये सुमारे 3,000 कुटुंब राहतात. यापैकी बऱ्याच कुटुंबियांचा सोसायटीच्या या निर्णयावर आक्षेप आहे. म्हणूनच या अपार्टमेंटचे सचिव हरी प्रकाश यांनी 10 जूनला हे पत्रक जारी केलं आणि 13 जूनला कोणीतरी ते सोशल मीडियावर पोस्ट केलं. पाहता पाहता पत्रक व्हायरल झालं आणि नेटकऱ्यांनी या सोसायटीला घेरायला सुरुवात केली. लुंगी आणि नाईटीबाबत काय अडचण आहे, असा थेट प्रश्न नेटकऱ्यांनी विचारला आहे. BJP : निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये इनकमिंग! गडकरी-फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये मोठा पक्ष प्रवेश या पोस्टवर गुलाम नामक ट्विटर युजरने लिहिलंय, ‘आपला देश हळूहळू तालिबानीकरणाकडे कूच करत आहे.’ तर, अल्फा नामक युजरने ‘तालिबान इन द हाउस’ असं म्हटलं आहे.