जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / BJP : निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये इनकमिंग! गडकरी-फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये मोठा पक्ष प्रवेश

BJP : निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये इनकमिंग! गडकरी-फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये मोठा पक्ष प्रवेश

निवडणुकीआधी भाजपमध्ये इनकमिंगला सुरूवात

निवडणुकीआधी भाजपमध्ये इनकमिंगला सुरूवात

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींसाठी सगळ्याच राजकीय पक्षांची तयारी सुरू झाली आहे, त्यातच आता भाजपमध्ये इनकमिंग सुरू झालं आहे.

  • -MIN READ Nagpur,Maharashtra
  • Last Updated :

नागपूर, 14 जून : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींसाठी सगळ्याच राजकीय पक्षांची तयारी सुरू झाली आहे, त्यातच आता भाजपमध्ये इनकमिंग सुरू झालं आहे. काँग्रेसमधून निलंबित झालेले आशिष देशमुख हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. 18 जूनला नितीन गडकरी यांच्या उपस्थितीमध्ये आशिष देशमुख भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. या पक्षप्रवेशाचा फोटो समोर आला आहे. आशिष देशमुख हे सावनेर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढण्यास इच्छूक आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.

News18

आशिष देशमुख यांची काँग्रेसमधून हकालपट्टी राहुल गांधी यांच्यावर केलेल्या टीकेमुळे आशिष देशमुख यांचं काँग्रेसने 6 वर्षांसाठी निलंबन केलं होतं. राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाचा अपमान केला आहे. मोदी आडनावावरुन राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाची माफी मागितली पाहिजे, असं आशिष देशमुख म्हणाले होते. ‘नाना पटोलेंना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून महिन्याला एक खोका मिळत असल्याचा दावा, आशिष देशमुख यांनी केला होता. पटोले हे लवकरच गुवाहाटीला असतील, त्यांना सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून महिन्याला 1 खोका दिला जातो, असा खळबळजनक आरोपही आशिष देशमुख यांनी केला होता. काँग्रेसच्या बालेकिल्ल्यावर राष्ट्रवादीची नजर! ठाकरेंना काय? महाविकासआघाडीत नवी खडाखडी? उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गट एकत्र येऊन महाविकास आघाडी तुटेल. दोन्ही गट एकत्र आल्यानंतर भाजपला पाठिंबा देणार असल्याचा दावाही आशिष देशमुख यांनी केला. सध्याच्या परिस्थितीत ठाकरे गटाचे खासदार, आमदार निलंबित होऊ नये म्हणून ठाकरे गट शिंदे गटासोबत जाईल. ठाकरे गटाच्या कोणत्याही आमदार, खासदारांना आपलं राजकीय भवितव्य डावावर लावायचं नाही, असंही आशिष देशमुख म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात