JOIN US
मराठी बातम्या / Viral / पायाला जखम तरी रस्त्यावर किचेअन विकतोय चिमुकला, हा Video हृदय पिळवटून टाकणारा

पायाला जखम तरी रस्त्यावर किचेअन विकतोय चिमुकला, हा Video हृदय पिळवटून टाकणारा

हा व्हिडीओ गुजरातच्या अहमदाबादमधील असल्याचं सांगितलं जात आहे. ज्यामध्ये एक लहान मुलगा रस्त्यावर किचेअन विकताना दिसत आहे.

जाहिरात

व्हायरल व्हिडीओ

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 25 जून : ट्राफिक सिग्नलवर तुम्हाला नेहमीच लोक दिसतील, जे काही गोष्टी विकताना दिसतील. यामध्ये काही महिला किंवा लहान मुलं देखील असतात. त्यांचं हातावरचं पोट असतो. जितक्या वस्तू विकल्या जातील त्यावर त्यांचं पोट भरतं. सध्या अशाच एका लहान मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एक लहान मुलगा दिसत आहे. पण त्याची अवस्था हृदय पिळवटून टाकणारी आहे. हा व्हिडीओ गुजरातच्या अहमदाबादमधील असल्याचं सांगितलं जात आहे. ज्यामध्ये एक लहान मुलगा रस्त्यावर किचेअन विकताना दिसत आहे. हा मुलगा खूपच लहान आहे, त्याचं काम करण्याचं वय नाही, पण परिस्थितीमुळे त्यांच्यावर अशी वेळ आली आहे. Viral Video : रागावलेल्या भावला सॉरी म्हणत होती चिमूकली, त्यानं पाहिलं नाही म्हणून थेट… हे चित्र एवढ्यावरच थांबत नाही, जर तुम्ही नीट पाहिलंत तर तुमच्या लक्षात येतील की, त्या मुलाच्या पायाला काहीतरी लागलं आहे आणि त्याने पायाला पिशवी बांधली आहे. अशा अवस्थेत देखील हे मुल सिग्नल वर आपलं काम करत आहे. Video : हृदयाचा ठोका चुकवणारा अपघात; कित्येक मीटर उंच उडाली व्यक्ती आणि… साक्षी नावाच्या महिलेने हा व्हिडिओ तिच्या अकाउंटवर (@sj.artsylens) ७ जून रोजी पोस्ट केला होता आणि तो आतापर्यंत लाखो वेळा पाहिला गेला आहे. हा मुलगा फूटपाथवर बसून ट्रॅफिक सिग्नलवर जाणाऱ्या वाहनचालकांना किचेअन विकताना दिसत आहे.

संबंधित बातम्या

हा व्हिडीओ खरोखरंच हृदय पिळवटून टाकणारा आहे. या व्हिडीओवर लोकांनी कमेंट करायला सुरुवात केली आहे. यामध्ये काहींनी लिहिलं आहे की तो मुलगा भिख न मागता कमावून खात आहे याबद्दल मला आदर आहे. तर काहीनी अशा लोकांना मदत करण्यासाठी देखील लोकांना आवाहन केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या