JOIN US
मराठी बातम्या / Viral / हे फनी बिलकुल नाही! भरमंडपात नवरदेवाने नवरीसोबत केलं असं काही की VIDEO पाहून नेटिझन्स संतप्त

हे फनी बिलकुल नाही! भरमंडपात नवरदेवाने नवरीसोबत केलं असं काही की VIDEO पाहून नेटिझन्स संतप्त

नवरदेवाने नवरीसोबत जे केलं ते काही जणांना फनी वाटतं आहे. पण काही जणांनी मात्र यावर संताप व्यक्त केला आहे.

जाहिरात

नवरा-नवरीचा व्हिडीओ.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 29 मार्च :  लग्ना चे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ इमोशनल तर काही फनी असतात. लग्नाचा असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतो आहे, जो पाहून काही लोकांना हसू आवरलं नाही. पण काहींनी मात्र संताप व्यक्त केला आहे. कारण नवरेदवाने भरमंडपात नवरीसोबत असं काही केलं आहे की अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. लग्नात बऱ्याच विधी असतात. अशाच विधी होत असतानाचा हा व्हिडीओ आहे. ज्यात नवरा-नवरी दोघंही शेजारी शेजारी उभे आहेत. त्यांच्या आजूबाजूला बरेच नातेवाईकही आहेत. पंडित खाली बसले आहेत. पंडित नवरीबाईला एका ठिकाणी पाय ठेवायला सांगतात. त्यावेळीच नवरदेव तिच्यासोबत असं काही करतो की ते पाहून कदाचित तुम्हालाही राग येईल. उतावळी नवरी अन्…! लग्नाआधी नवरदेवाने पुरवली नाही ‘ती’ हौस; तिनं उचललं टोकाचं पाऊल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता पंडितने सांगितल्यानंतर नवरी एका ठिकाणी पाय ठेवायला जाते. त्यावेळी नवरदेव थोडा खाली वाकतो. तिच्या पायाला हात लावयला जातो. त्यावेळी मागे असलेले त्याचे नातेवाईक त्याला थांबवतात. नवरीच्या पायाला हात लावण्यापासून रोखतात. तसा तो उभा राहतो. त्यानंतर मात्र तो आपल्या पायाने नवरीच्या पायाला लाथ मारतो.

नवरदेवाने पायावर किक मारताच नवरीबाई धाडकन खाली कोसळते. ती जोरात आपटते. तिथं उपस्थित तसे सर्वजण हसू लागतात. व्हिडीओ पाहिल्यावरही सुरुवातीला हसू येतं. पण नवरीसोबत जे घडलं ते बिलकुल योग्य नव्हतं, असंही दिसतं. काहे दिया परदेस! सासर दूर म्हणून रागात नवरीने रस्त्यातच….; 7 जन्मांचा प्रवास 7 तासांतच संपला या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना काही लोकांना या व्हिडीओची मजेशीर बाजू पाहत अनेकांना टॅग केलं आहे. तर काहींनी मात्र हा व्हिडीओ बिलकुल मजेशीर नाही आहे. नवरदेवाने नवरीचा अपमान केला आहे, अशा मुलांना मुलगी देऊच नये, असं म्हटलं आहे.

संबंधित बातम्या

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटलं, ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या