मराठी बातम्या /बातम्या /Viral /काहे दिया परदेस! सासर दूर म्हणून रागात नवरीने रस्त्यातच....; 7 जन्मांचा प्रवास 7 तासांतच संपला

काहे दिया परदेस! सासर दूर म्हणून रागात नवरीने रस्त्यातच....; 7 जन्मांचा प्रवास 7 तासांतच संपला

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

लग्नानंतर पाठवणी झाल्यानंतर सासरी पोहोचेपर्यंत नवरी वैतागली आणि रस्त्यात मध्येच तिने धक्कादायक पाऊल उचललं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Uttar Pradesh, India

वाराणसी, 18 मार्च : लग्न म्हणजे 7 जन्मांचं नातं. नवरा-बायकोची साथ सात जन्मांची. पण एका नवदाम्प्त्याचा सात जन्मांचा हा प्रवास 7 तासांतच संपला आहे. याला कारण ठरलं ते म्हणजे नवरीचं माहेर आणि सासरमधील अंतर. नवरीचं सासर इतकं दूर होतं की ती वैतागली. लग्नानंतर पाठवणी झाल्यानंतर सासरी पोहोचेपर्यंत ती वैतागली आणि रस्त्यात मध्येच तिने धक्कादायक पाऊल उचललं. उत्तर प्रदेशमधील हे प्रकरण आहे.

यूपीच्या वाराणसीत राहणारी वैष्णवी जिचं लग्न राजस्थानच्या बिकानेरमधील रवीसोबत ठरलं. रवी गुरुवारी बिकानेरहून वरात घेऊन  वाराणसीत आला. फार खर्च नको म्हणून त्यांनी आधी वाराणसी कोर्टात लग्न केलं. त्यानंतर साध्या पद्धतीत लग्न उरकलं. वैष्णवीची माहेरहून सासरी पाठवणी झाली. माहेर ते सासर तब्बल 1300 किलोमीटरचं अंतर होतं.

वाराणसीहून सुमारे 700 किलोमीटर अंतर त्यांनी पार केलं. जवळपास 7 तासांनी ते कानपूरहून सरसौलला पोहोचले. त्यावेळी नवरदेवाला चहा-नाश्ता करायचा होता. म्हणून सरसौलच्या दूध माता पेट्रोल पंपाजवळ त्यांनी आपली कार थांबवली. रवी आणि त्यांच्यासोबत असलेले त्यांचे इतर नातेवाई कारमधून उतरले. वैष्णवी गाडीतच होती. त्यावेळी तिथं पोलिसांचीही गाडी होती.  पोलिसांना पाहून कारमध्ये असलेली वैष्टणवी मोठमोठ्याने ओरडू, रडू लागली. पोलिसांनी तिला रडताना पाहिलं. तिला पळवून तर नेलं जात नाही ना, असा संशय त्यांना वाटला. त्यामुळे त्यांनी वैष्णवीची चौकशी केली.

VIDEO - आलिया गावात अजब वरात! कार-घोड्याऐवजी नवरा-नवरी चक्क गाढवावर, कारण...

वैष्णवी म्हणाली, "हे लोक मला लग्न करून घेऊन जात आहेत. यांनी आधी सांगितलं की ते इलाहाबादमधील प्रयागराजमध्ये राहतात पण आता मला राजस्थानच्या बिकानेरला नेत आहेत. वाराणसीहून सात तासांच्या प्रवासात मी थकले आहे. आता मला यापुढे जायचं नाही आहे. मला आताच लग्न मोडायचं आहे. मला इतक्या दूर लग्न करायचं नाही. मला माझ्या आईच्या जवळच राहायचं आहे"

नवरीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सर्वांना महराजपूर पोलीस ठाण्यात नेलं. वरपक्षाने कोर्ट मॅरेजची कागदपत्रं दाखवली. आम्ही बिकानेरचे राहणारे आहोत. वधूपक्षाला याची माहिती असल्याचं सांगितलं. यानंतर पोलिसांनी वैष्णवीच्या आईला फोन केला आणि तिला याबाबत विचारणा केली. वैष्णवीची आई म्हणाली, "माझा नवरा नाही. एका नातेवाईकाने माझ्या मुलीचं लग्न ठरवलं होतं. मुलगा इलाहाबादमध्ये राहणारा आहे आम्हाला हेच माहिती होतं. आता जर माझ्या मुलीला बिकानेरला नाही जायचं आहे तर तिला तिला तिथूनच पुन्हा वाराणसाीला पाठवा. आम्ही लग्न मोडतो"

'तिची कस्टडी मला द्या', विवाहित GF साठी BF ची पुराव्यासह कोर्टात धाव; प्रकरणाचा निकाल काय पाहा

यानंतर पोलिसांनी नवरीला समजावण्याचा प्रयत्न केला. पण ती ऐकायलाच तयार नाही. तिला इतक्या लांब सासरी जायचंच नव्हतं. आज तकच्या शेवटी पोलिसांनी तिला वाराणसीला तिच्या आईकडे पोहोचवलं आणि नवरदेव बिकानेरला निघून गेला. नवदाम्पत्याची संसाराची गाडी 700 किलोमीटरवर येऊन थांबली. त्यांचा 7 जन्मांचा प्रवास अर्ध्या रस्त्यात 7 तासांतच संपला.

First published:

Tags: Bridegroom, Marriage, Viral, Wedding