नवी दिल्ली 03 एप्रिल : सोशल मीडियावर दररोज असे हजारो व्हिडीओ व्हायरल (Viral on Social Media) होत असतात, ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर हसू येतं. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे, ज्यामध्ये एका वयोवृद्ध महिलेला लस टोचली जात आहे. पण इंजेक्शन पाहून तिच्या अंगावर काटा फुटला आहेत. यावेळी तिने इंजेक्शन पाहून दिलेली रिअॅक्शन सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असून त्याबाबत अनेक मीम्सही बनवण्यात आले आहेत. काय आहे व्हिडीओमध्ये ? इन्स्टाग्रामवर सध्या एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतं आहे. हा व्हिडीओ (instantbollywood) नावाच्या एका इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत तुम्ही पाहु शकता, एका वयोवृद्ध महिलेला इंजेक्शन दिलं जात आहे. यावेळी संबंधित वयोवृद्ध महिलेनं विचित्र रिअॅक्शन देत किंचाळली आहे. इंजेक्शन देताना तिला दोन जणांनी घट्ट पकडलं आहे, तर तिसरी एक महिला तिला इंजेक्शन देण्याचा प्रयत्न करत आहे. इंजेक्शन घेताना वयोवृद्ध महिलेनं दिलेले हावभाव आणि रिअॅक्शन सोशल मीडियात वेगाने व्हायरल होतं आहे.
हे ही पाहा - Shocking! शवपेटीत तब्बल 50 तास जिवंत दफन झाला आणि…; VIDEO पाहूनच हादराल हा व्हिडीओ पाहून अनेक वापरकर्ते आपलं हसू आवरू शकत नाहीयेत. आतापर्यंत या व्हिडीओला 27 लाखाहून अधिक लोकांनी पाहिलं आहे. तर अनेकांनी कमेंटचा वर्षाव करत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका वापरकर्त्याने लिहिलं की, संबंधित आजी दिल्लीच्या आहेत. तर अनेकांनी या व्हिडीओला निरागस व्हिडीओ असं संबोधलं आहे.