JOIN US
मराठी बातम्या / Viral / 2 चवताळलेले हत्ती जेव्हा आपसात भिडतात; भयंकर लढाईचा VIDEO होतोय व्हायरल, एकदा पाहाच

2 चवताळलेले हत्ती जेव्हा आपसात भिडतात; भयंकर लढाईचा VIDEO होतोय व्हायरल, एकदा पाहाच

या व्हिडिओमध्ये दिसतं, की दोन हत्ती समोरासमोर उभे आहेत आणि काही वेळातच ते एकमेकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करू लागले. काही वेळाने त्यांच्यातील भांडण वाढत जातं.

जाहिरात

हत्तींच्या लढाईचा व्हिडिओ

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 06 मे : जंगली प्राण्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. यात कधी प्राण्यांची लढाई तर कधी मैत्री पाहायला मिळते. हे व्हिडिओ नेटकऱ्यांच्या विशेष पसंतीस उतरतात. जंगलातील प्रत्येक प्राण्यात काहीतरी वेगळेपण असतं. हत्ती हा अतिशय साधा स्वभाव आणि इतरांप्रती प्रेमळ असा प्राणी मानला जातो. पण जेव्हा या महाकाय प्राण्याला राग येतो तेव्हा तो आकाश डोक्यावर घेतो. इंटरनेटवर असे अनेक व्हिडिओ आहेत ज्यात हत्ती मजा-मस्ती करताना तसंच मानव आणि इतर प्राण्यांशी अतिशय प्रेमाने वागताना दिसतात. पण त्रास दिल्यास त्यांना खूप राग येतो आणि मग ते समोरच्याची काय अवस्था करतील, हे सांगूही शकत नाही. आता दोन हत्तींच्या झुंजीचा एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. जो चांगलाच व्हायरल होत आहे.

संबंधित बातम्या

ट्विटरवरील या व्हिडिओमध्ये दिसतं, की दोन हत्ती कसे समोरासमोर उभे आहेत आणि काही वेळातच ते एकमेकांवर हळूवारपणे हल्ला करण्याचा प्रयत्न करू लागले. काही वेळाने त्यांच्यातील भांडण वाढत जातं. दोन हत्तींची झुंज दाखवणारा हा व्हिडिओ चालत्या वाहनातून कोणीतरी रेकॉर्ड केला आहे. लढाई दरम्यान दोन्ही हत्ती आपले दात एकमेकांसोबत गुंतवताना दिसतात.

ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर करताना, IFS अधिकारी बडोला यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, “टायटन्सचा संघर्ष!” ही क्लिप आतापर्यंत 10 हजार वेळा पाहिली गेली आहे आणि ही संख्या हळूहळू वाढत आहे. व्हिडिओवर अनेक कमेंट्सही आल्या आहेत. लोकांनी या व्हिडिओवर कमेंट करत हे अतिशय अविश्वसनीय आणि दुर्मिळ असल्याचं म्हटलं. व्हिडिओ पाहून प्रत्येकजण थक्क झाला आहे. काही नेटिझन्स हत्तींच्या लढाईमागील कारण जाणून घेण्यासाठी उत्सुक दिसले, तर काहींनी सांगितलं की त्यांनी यापूर्वी कधीही हत्तींना एकमेकांशी लढताना पाहिलं नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या