लाल-काळ्या मुंग्याचे शुभ-अशुभ संकेत
काही गोष्टींचा वास्तूशास्त्रानुसार काही ना काही अर्थ नक्कीच असतो. तसेच घरात मुंग्या येण्याचेही काही लक्षण आहेत.
वास्तूशास्त्रानुसार घरात मुंग्याची रांग लागणं हे घरामध्ये सुख आणि संपत्ती असल्याचे लक्षण मानले जाते
याच कारणामुळे अनेक लोक मुंग्यांना मारत नाहीत, उलट त्यांना धान्य वगैरे खाद्य पुरवतात.
चला काळ्या आणि लाल मुंग्यांचे चांगले-वाईट लक्षण काय आहे, पाहू
भिंतीवर मुंग्या
भिंतींवर मुंग्याची रांग चढताना दिसली तर याचा अर्थ घरात शुभ कार्य होणार आहे. हे समृद्धी आणि प्रगतीचे लक्षण मानले जाते.
भिंतींवर मुंग्या उतरत असतील तर मात्र ते नुकसानीचे लक्षण मानले जाते.
काळ्या मुंग्या
घरात काळ्या मुग्यांची रांग लागली असेल तर तुमच्या आयुष्यात लवकरच धनसंपत्ती आणि सुख येणार आहे.
तांदळाच्या डब्यात मुंग्या
मुंग्या तांदळाच्या डब्यातून बाहेर येत असतील तर ते चांगले चिन्ह मानले जाते. हे धनाच्या आगमनाचे लक्षण आहे.
लाल मुंग्या
घरात लाल मुंग्या दिसल्या तर मात्र ते अशुभ मानले जाते. त्याचा अर्थ आयुष्यात त्रास, वाद आणि ज्यादा खर्च होण्याची शक्यता असते.
मात्र घरात लाल मुंग्या तोंडात अंडी घेऊन दिसल्या तर ते शुभ चिन्ह मानले जाते. तुमच्या घरातील महत्त्वाचे काम प्रगतीपथावर असल्याचे हे चिन्ह आहे.