धक्कादायक व्हिडीओ
मुंबई, 26 जुलै : काहीही संकट आलं किंवा आपत्ती आली तर माणसांना सगळ्यात आली आपल्या घरी राहण्याचा सल्ला दिला जातो. कारण घरापेक्षा सुरक्षित जागा कोणतीही नाही. पण एक असा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुम्हाला घर देखील सुरक्षित जागा नाही असं भासू लागेल. एका लहान मुलासोबत झालेल्या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आईने मुलाला बेडरूममध्ये पंख्याच्या वाऱ्याखाली झोपवले होते. परंतू हीच गोष्ट तिच्या मुलासाठी धोक्याची देखील ठरु शकते, याचा तिने विचार देखील केला नसावा. व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक मूल बेडवर आरामात झोपलेले दिसत आहे. मुलाचे वय आठ ते नऊ महिन्यांच्या दरम्यान असेल. हे मूल पोटावर झोपले होते. तेव्हाच पंख्याचा समोरचा भाग तुटून त्याच्या अंगावर पडला. ज्यामुळे हे बाळ जोरात ओरडलं आणि रडू लागलं. मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकून त्याची आई धावत आली. पोस्टमार्टम हाउसमधून कुटुंबियांनी आणला मृतदेह, अंत्यसंस्काराच्या वेळी चेहरा पाहताच बसला धक्का हा व्हिडीओ पाहून तुम्ही अंदाजा लावू शकता की या मुलाच्या संरक्षणासाठी किती काळजी घेतली होती. परंतू त्यांची एक चुक मात्र त्यांना महागात पडली. समजू शकते की या कुटुंबाने आपल्या मुलाच्या संरक्षणासाठी किती उपयोग केला. पलंगाच्या आजूबाजूला जाळ्या लावल्या होत्या. हॉटेलमध्ये थांबताना बाथरुममध्ये चुकूनही ठेवू नका टूथब्रश, महिला मॅनेजरचा धक्कादायक खुलासा भिंतीच्या पंख्याचा समोरचा अर्धा भाग अचानक उघडून मुलाच्या डोक्यावर पडला. ज्यानंतर हे बाळ जोरजोरात रडू लागलं. आता या बळाला नक्की केवढं लागलं किंवा केवढी दुखापत झाली हे कळू शकलेलं नाही.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. तो आतापर्यंत लाखो वेळा पाहिला गेला आहे. हा व्हिडीओ मलेशियाचा असल्याचे सांगण्यात येत आहे. यावर प्रतिक्रिया देताना एका व्यक्तीने विचारले की हा पंखा चीनमध्ये बनवला आहे का? त्याच वेळी, अनेकांनी मुलाबद्दल चिंता व्यक्त केली आहे.