जाहिरात
मराठी बातम्या / Viral / हॉटेलमध्ये थांबताना बाथरुममध्ये चुकूनही ठेवू नका टूथब्रश, महिला मॅनेजरचा धक्कादायक खुलासा

हॉटेलमध्ये थांबताना बाथरुममध्ये चुकूनही ठेवू नका टूथब्रश, महिला मॅनेजरचा धक्कादायक खुलासा

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

यामागे एक विचित्र कारण आहे, ज्याबद्दल खुद्द हॉटेल मॅनेजरने माहिती दिली आहे. हे ऐकून तुम्हाला नक्कीच किळस येईल.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 25 जुलै : कोणत्याही दुसऱ्या शहरात किंवा भागात फिरायला गेलं की हमखास तिथे राहण्यासाठी तुम्हाला सोय करावी लागते. तिथे हॉटेल बुक केला की बऱ्याच ठिकाणी आपल्याला हॉटेल त्यांच्या वस्तू देतो, पण काही वस्तू आपल्याच आपल्याला वापराव्या लागतात. यामध्ये ब्रश, साबण, टॉवेलचा समावेश आहे. हॉटेलमध्ये मुक्काम करताना पाहुणे खोलीला स्वतःची खोली समजू लागतात आणि खोली आणि बाथरूममधील वस्तू तशाच ठेवतात. टूथब्रश ही देखील अशीच एक गोष्ट आहे जी लोक बाथरूमच्या सिंकजवळ किंवा स्टँडमध्ये ठेवतात. जोपर्यंत तो हॉटेलमध्ये राहतो तोपर्यंत तो ब्रश त्याच स्टँडमध्ये तसाच पडून राहतो. तुम्ही देखील असंच करात असाल तर थांबा, हे चुकूनही करु नका. यामागे एक विचित्र कारण आहे, ज्याबद्दल खुद्द हॉटेल मॅनेजरने माहिती दिली आहे. हे ऐकून तुम्हाला नक्कीच किळस येईल. हॉटेलमध्ये राहताना बेडखाली नक्की फेका पाण्याची बाटली, तरच रहाल सुरक्षित, नक्की हा प्रकार काय? डेली स्टार न्यूज वेबसाईटच्या रिपोर्टनुसार, मेलिसा नावाची महिला याआधी हॉटेल मॅनेजर होती. आता ती सोशल मीडियावर @melly_creations_ खात्याद्वारे लोकांना प्रवासाच्या टिप्स आणि सूचना देते. मेलिसाने नुकताच टिकटॉकवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये तिने हॉटेलमध्ये राहताना बाथरूममध्ये टूथब्रश का सोडू नये याची माहिती दिली आहे.

News18

मेलिसाने सांगितले की, अनेकवेळा गेस्ट हॉटेलच्या कर्मचाऱ्यांशी उद्धटपणे वागतात आणि त्यावेळी कधीकधी कर्मचारी मंडळी याचा राग कोणत्याही इतर गोष्टींवर काढतात. हॉटेलचे नाव खराब होऊ नये, म्हणून कर्मचारी त्यावेळेस गेस्टला काहीही न बोलता शांत रहातात. पण याचा बदला ते कोणत्या ना कोणत्या पद्धतीने नक्कीच घेतात. बहुतांश वेळा गेस्ट हॉटेलमधून बाहेर पडल्यावर त्याचे रुमची सफाई करण्यासाठी काही कर्मचारी येतात. ते खोल्या आणि बाथरुम साफ करतात. अशा वेळी गेस्टने बाथरूममध्ये सोडलेल्या टूथब्रशवर ते त्यांचा राग काढतात. हे लोक त्या ब्रशने रुमचे सिंग किंवा बाथरुन, संडास साफ करतात. मेलिसा म्हणाली की जेव्हा ती मॅनेजर होती तेव्हा तिने अधूनमधून स्टाफ सदस्याकडून असे वागल्याचे ऐकले होते. तथापि, मेलिसाने आजपर्यंत असे काहीही केलेले नाही आणि जर कोणी तिच्यासमोर असे कृत्य करताना पकडले गेले असेल, तर तिने त्याला नक्कीच काढून टाकले असते. मेलिला आाता लोकांना सुचवले की जेव्हा ते हॉटेलच्या खोलीत टूथब्रश वापरतात तेव्हा ते वापरल्यानंतर पुन्हा बॅगेत ठेवा. ज्यामुळे त्यांच्यासोबत असा प्रकार होणार नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात