उंदरांमुळेच साप आत शिरला असावा, असं सर्पमित्र म्हणाले.
अनुप पासवान, प्रतिनिधी कोरबा, 10 जून : घरातील सोफा, खुर्च्या, कपाट आणि इतर सर्व फर्निचर वेळच्या वेळी साफ करून घेत जा. कारण आपण आरामात ज्याच्यावर बसतो त्या सोफ्यातच चक्क साप दडून बसल्याची घटना छत्तीसगडच्या कोरबा जिल्ह्यातून समोर आली आहे. त्याचं झालं असं की… राकेश मिश्रा हे पहाटे 5 वाजता मॉर्निंग वॉकसाठी निघाले होते. त्यावेळी अचानक घरात त्यांना काहीतरी वळवळताना दिसलं. त्यांनी निरखून पाहिलं तर तो चक्क साप होता. ते पाहतच बसले, तर तो थेट त्यांच्या सोफ्यात शिरला. हे सर्व पाहून राकेश यांना काय करावं आणि काय नको असं झालं. त्यांनी घरातील सर्वांना सोफ्यापासून दूर राहायला सांगितलं. त्यानंतर थोड्या वेळात असं काही झालं की घरातल्यांना मोठा धक्का बसला.
आपल्या घरात साप आहे या विचारानेच हे पूर्ण कुटुंब प्रचंड घाबरलं होतं. त्यांनी जरा उजेड पडताच वन विभागाच्या वन्यजीव बचाव पथकाला फोन करून याबाबत माहिती दिली. त्यानंतर सर्पमित्र जितेंद्र सारथी हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. कोणालाही सापापासून धोका पोहोचू नये यासाठी त्यांनी घाईघाईने सोफा घराबाहेर काढून फाडण्यास सुरुवात केली. काही वेळातच पूर्ण सोफा फाटला आणि आत जे किळसवाणं दृश्य दिसलं ते पाहून त्या घरातले सर्वजण रडकुंडीला आले. हनिमूनला नववधूनं असं काय काय सांगितलं की, नवरदेवानं मोडलं लग्न सोफा आतून पूर्णपणे उंदरांनी भरला होता. सोफ्याच्या आतले एकूण एक कपडे कुरतडलेले होते. या उंदरांमुळेच साप आत शिरला असावा, असं सर्पमित्र म्हणाले. उंदरांमध्ये शोधाशोध केल्यानंतर एका कोपरात साप वळवळताना दिसला. हा Checkered keelback जातीचा साप होता. जे अतिशय सामान्य साप असतात. परंतु सामान्य असो किंवा असामान्य असो, साप म्हटल्यावर भीती तर वाटतेच. अखेर सर्पमित्रांनी त्याला उचलून गोणीत बांधला आणि घरातील सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. सर्पमित्र जितेंद्र सारथी यांनी सांगितलं की, Checkered keelback हा पाण्यात राहणारा साप आहे. तो खूप खतरनाक आणि चिडखोर असतो सारखा सारखा चावा घेतो परंतु त्याच्या चावण्याने कुठलीही इजा होत नाही.