फेस मास्कमुळे भयंकर अवस्था
मुंबई, 21 मे : चेहरा क्लिन व्हावा, चेहऱ्यावर ग्लो यावा, फ्रेश वाटावं म्हणून अनेक जण फेस मास्कचा वापर करतात. बऱ्याच प्रकारचे फेस मास्क उपलब्ध आहे. तुम्हीही अशाच फेस मास्कचा वापर करत असाल तर सावध व्हा. अशाच फेस मास्कमुळे एका तरुणीची भयंकर अवस्था झाली आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. सोशल मीडियावर मेकअप आणि ब्युटी टीप्सचे बरेच व्हिडीओ शेअर केले जातात. हे व्हिडीओ पाहून काही तरुणी घरीच स्वतः या टिप्स आजमावून पाहतात. पण यासाठीही प्रशिक्षणाची गरज असते. त्यामुळे जर हा मेकअप नीट केला नाही. तर त्याचे उलट परिणाम होतील. असाच परिणाम या तरुणीला भोगावा लागला. अरारा! याचं गाणं ऐकून भिरभिरलं सर्वांचं डोकं; VIDEO पाहून सांगा तुम्हाला कसं वाटलं? व्हिडीओत तुम्ही पाहू शकता तरुणीच्या चेहऱ्यावर लाल रंगाचा फेस मास्क आहे. जो तिच्या चेहऱ्यावरून कुणीतरी काढत आहे. फेस मास्क चेहऱ्यावर इतका घट्ट चिकटला आहे की तो सहज निघत नाही आहे. एक नव्हे तर दोघीजणी तिच्या चेहऱ्यावरील फेस मास्क काढत आहेत. तरुणीला तो मास्क काढताना खूप वेदना होत आहेत. ती मोठमोठ्याने ओरडते आहे. तिची इतकी भयंकर अवस्था झाली आहे की तिच्यावर रडण्याची वेळ आली आहे. videonation.teb या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. OMG! पक्ष्यासारखा उडू लागला तरुण पण झाला धक्कादायक शेवट; WATCH VIDEO व्हिडीओ तसा धडकी भरवणाराच आहे. मुलीची अवस्था पाहून अनेकांनी चिंता व्यक्त केली. तर काहींनी यावर मजेशीर कमेंटही केल्या आहेत.
तुम्ही कधी असा कोणता ब्युटी हॅक्स केला होता आणि तो फसला होता का? ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.