जाहिरात
मराठी बातम्या / Viral / अरारा! याचं गाणं ऐकून भिरभिरलं सर्वांचं डोकं; VIDEO पाहून सांगा तुम्हाला कसं वाटलं?

अरारा! याचं गाणं ऐकून भिरभिरलं सर्वांचं डोकं; VIDEO पाहून सांगा तुम्हाला कसं वाटलं?

खतरनाक गाणं गाणारा तरुण

खतरनाक गाणं गाणारा तरुण

खतरनाक गाणं गाणाऱ्या या तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

नवी दिल्ली, 20 मे : गाणी ऐकायला अनेकांना आवडतात. पण काही लोकांना गाणी गायला आवडतात. गाण्याचं रितसर प्रशिक्षण घेतलं नसलं तरी किती तरी लोक गाणी गातात. कधी तुम्ही आम्ही आपण सर्वजण कधी ना कधी किमान बाथरूममध्ये तरी अंघोळ करताना गाणं गायलो आहोत. अशाच एका हौशी गायकाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. त्याचं गाणं ऐकून सर्वांचं डोकं भिरभिरलं आहे. एका तरुणाने असं गाणं गायलं आहे की ते ऐकून लोकांची अवस्था वाईट झाली आहे. त्याचं गाणं इतकं खतरनाक आहे की ऐकूनच अनेकांचं डोकं भिरभिरलं आहे. काही लोकांनी तर संताप व्यक्त केलं आहे. OMG! पक्ष्यासारखा उडू लागला तरुण पण झाला धक्कादायक शेवट; WATCH VIDEO व्हिडीओतील या तरुणाचं गाणं नीट ऐका. सुरुवातीला तो एका गाण्याची ओळ बोलते. ते पूर्ण होत नाही की लगेच दुसरं गाणं गातो. असं करत करत तो तिसरं आणि चौथ्या गाण्याचीही एकएक ओळ गातो. त्याने डीजे स्टाईलमध्ये त्याने तोंडाने डीजेसारखं गाणं गाण्याचा प्रयत्न केला पण त्याचा हा प्रयत्न मात्र पुरता फसला आहे. त्याचं गाणं आवडणं तर दूर लोकांना ऐकवासंही वाटत नाही आहे. saregama_lilchamps नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ‘डीजे वाले बाबू मेरा गाना बाजा दो’ असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. VIDEO - स्कूटीगर्ल आणि सायकलवाला एका छोट्याशा गल्लीत अडकले; पुढे जे घडलं ते पाहूनच झटका बसेल त्याचं हे अनोखं गाणं ऐकून काही जणांनी राग व्यक्त केला आहे, तर काही जणांनी त्याची मजा घेतली आहे. काही युझर्सनी शांत राहा, भाई आता घर सोडा, असं म्हटलं आहे. तर काहींनी हे गायक कुठून आलेत, त्यांना पुरस्कार द्या, ते खूप प्रतिभावान आहेत, त्यांचं गाणं ऐकून मन भरून आलं, असं म्हटलं आहे. पण एक मात्र आहे, या तरुणाचा आत्मविश्वास मात्र डगमगला नाही. यासाठी त्याचं कौतुक करायलाच हवं.

जाहिरात

तुम्हाला हे गाणं कसं वाटलं, ते ऐकून काय वाटलं, याबाबत तुमची प्रतिक्रिया आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात