नाल्यात सिगारेट टाकताच स्फोट (प्रतिकात्मक फोटो)
नवी दिल्ली 09 मे : कधीकधी आगीची छोटीशी ठिणगीही धोकादायक ठरते. म्हणूनच आगीशी कधीही खेळू नये असे म्हणतात. तुम्ही पाहिलं असेल की अनेकदा लोक सिगारेट किंवा बिडी जाळल्यानंतर ती कुठेही फेकून देतात. यामुळे कोणत्या प्रकारचं नुकसान होऊ शकतं, याचा विचारही ते करत नाहीत. विशेषत: पेट्रोल पंपावर अशा गोष्टींना सक्त मनाई आहे, पण तुम्ही कधी नाल्यात सिगारेट टाकताच मोठा स्फोट झाल्याचं पाहिलं आहे का? कदाचित तुमचं उत्तर नाहीच असेल. पण सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. आत प्रवासी असतानाच विमानाने घेतला पेट; भीषण दुर्घटनेचा थरकाप उडवणारा Live Video खरं तर, सिगारेट ओढल्यानंतर एक व्यक्ती ती विझवण्यासाठी नाल्यात फेकते, पण त्याला काय माहीत की ती त्याच्यासाठी जीवघेणी ठरेल. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक माणूस सिगारेट ओढत येतो आणि उरलेली सिगारेट झाकलेल्या नाल्याच्या छोट्या खड्ड्यात टाकतो, पण सिगारेट नाल्यात जाताच मोठा स्फोट होतो. सुदैवाने यात त्या व्यक्तीचा जीव वाचला असला तरी तो गंभीर जखमी झाल्याचं दिसतं. स्फोटानंतर तो रांगत तिथून दूर जाताना दिसतो.
हा व्हिडिओ काही वर्षांपूर्वीचा आहे, जो पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तुम्हीही सिगारेट ओढल्यानंतर ती कुठेही फेकत असाल तर सावधान, कारण असा अपघात तुमच्यासोबतही होऊ शकतो. हा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ ट्विटरवर @crazyclipsonly नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. अवघ्या 14 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 3.5 मिलियन म्हणजेच 35 लाख वेळा पाहिला गेला आहे, तर 66 हजारांहून अधिक लोकांनी लाईकही केला आहे. अनेकजण यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिलं की, ‘पॅकेटवर स्पष्टपणे लिहिलं आहे की धूम्रपान आरोग्यासाठी हानिकारक आहे. हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचं स्फोटक प्रकरण आहे’, तर दुसर्या वापरकर्त्याने लिहिलं की ‘हायड्रोजन सल्फाइड हा रंगहीन गॅस आहे, जो गटारांमध्ये जमा होतो आणि अत्यंत ज्वलनशील आणि विषारी आहे’.