जाहिरात
मराठी बातम्या / Viral / आत प्रवासी असतानाच विमानाने घेतला पेट; भीषण दुर्घटनेचा थरकाप उडवणारा Live Video

आत प्रवासी असतानाच विमानाने घेतला पेट; भीषण दुर्घटनेचा थरकाप उडवणारा Live Video

विमानाने घेतला पेट

विमानाने घेतला पेट

ट्विटरवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये धावपट्टीवर एक विमान उभं असून त्याला भीषण आग लागल्याचं दिसत आहे. ही आग त्या विमानाच्या मागील भागातच लागली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली 09 मे : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होतात. परंतु यात काही व्हिडिओ असेही असतात, जे वापरकर्त्यांना विचलित करतात. हे व्हिडिओ बहुतांशी कोणत्याही रस्त्यावरील अपघात किंवा अपघातग्रस्त विमान तसंच ट्रेनशी संबंधित असतात. असाच एक धक्कादायक व्हिडिओ आता समोर आला आहे. ज्यामध्ये एका विमानाला भीषण आग लागली आहे आणि लोक त्याच्या आतून बाहेर पडत पळताना दिसत आहेत. ट्विटरवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये धावपट्टीवर एक विमान उभं असून त्याला भीषण आग लागल्याचं दिसत आहे. ही आग त्या विमानाच्या मागील भागातच लागली आहे. व्हिडिओ पाहून असं वाटतं की, विमानातील तांत्रिक बिघाडामुळे त्याचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं असून यादरम्यान विमानाला आग लागली. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, प्रवासी विमानाच्या समोरील बाजूकडून बाहेर पडत पळत आहेत.

News18लोकमत
News18लोकमत

या जळत्या विमानाच्या पुढील भागाचं इमर्जन्सी गेट उघडं असून प्रवासी तिथून वेगाने खाली उतरून जीव वाचवण्यासाठी धावत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @ViciousVideos नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. ही घटना कुठे घडली आणि हा व्हिडिओ कधीचा आहे याची माहिती पोस्टमध्ये देण्यात आलेली नाही.

जाहिरात

हा व्हायरल व्हिडिओ आतापर्यंत सुमारे 1 लाखहून अधिकांनी पाहिला आहे. तर हजारो लोकांनी लाईकही केला आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत. या प्रवाशांच्या सामानाचं काय झालं? असा सवाल अनेकांनी केला आहे. या घटनेचा व्हिडिओ थरकाप उडवणारा आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: airplane , fire
  • First Published :
जाहिरात
जाहिरात