मुंबई, 18 ऑक्टोबर : हत्ती बुद्धीमान आणि तसा शांत स्वभावाचा प्राणी. हत्तीच्या करामती आणि खेळत असतानाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या हत्तीचा एक भन्नाट व्हिडीओ सध्या समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता हत्ती त्याच्या मालकासोबत छान खेळताना आणि मजा करताना दिसत आहे. हत्ती या व्हिडीओमध्ये तरुणासोबत खेळताना, व्यायाम करताना दिसत आहे. या व्हिडीओच्या शेवटी आपण पाहू शकता की हत्ती या तरुणाचा बॉडी मसाज करत आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की हत्ती स्वत: लॉनवर मॅट पसरून देतो आणि त्यानंतर मालक झोपल्यावर त्याच्या पाठीला तेल लावून आपल्या सोंडेनं मसाजही करून देत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
हे वाचा- पुरानं कंबरडं मोडलं; गाड्या वाहून गेल्या घरात पाणी शिरलं, छतावर थाटला संसार या हत्तीचं प्रेम पाहून युझर्स खूपच भावूक झाले आहेत. हा व्हिडीओ 11 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे. सर्वांच्या हृदयात स्थान मिळविणारा हा व्हिडिओ राजीव अग्रवाल नावाच्या व्यक्तीने ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडीओ सोबत असलेल्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे- हाथी मेरे साथी. व्हिडीओच्या सुरुवातीला एक माणूस स्कूटीवर बसलेला दिसत आहे. एक हत्ती त्याच्या जवळ आला आणि त्याला स्कूटीतून खाली नेतो आणि नंतर त्याचे हेल्मेट काढतो. त्यानंतर ते दोघं मिळून खेळतात. हत्ती त्याला मसाज करतो हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.