VIDEO : पुरानं कंबरडं मोडलं; पाण्यात वाहून गेल्या गाड्या, घर सोडून छतावर राहायची आली वेळ

VIDEO : पुरानं कंबरडं मोडलं; पाण्यात वाहून गेल्या गाड्या, घर सोडून छतावर राहायची आली वेळ

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे कोलकातासह पश्चिम बंगालच्या इतर भागात दुर्गापूजेच्या दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे.

  • Share this:

हैदराबाद, 18 ऑक्टोबर : महाराष्ट्रासह दक्षिण भारतात मुसळधार पावसानं थैमान घातलं आहे. शेतापासून ते घरापर्यंत पुराचं पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. रेल्वे ट्रॅकपासून ते रस्त्यांपर्यंत पुराचं पाणी आल्यामुळे नुकसान झालं आहे. पुराची भीषण परिस्थिती दाखवणे दोन व्हिडीओ समोर आले आहेत. या व्हिडीओमधून सध्या हैदराबादमध्ये किती भीषण परिस्थिती असेल याचा अंदाज येऊ शकतो.

दक्षिण भारतात मुसळधार पावसानं कहर केला. तेलंगण, आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे परिस्थिती चिंताजनक आहे. हैदराबादमध्ये रस्त्यांना नदीचं स्वरुप आलं. या महापुरात आतापर्यंत 50 जणांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी रात्री हैदराबादमध्ये मुसळधार पाऊस पडला आहे.

हे वाचा-कडक सॅल्युट! जलमय झालेल्या रस्त्यातून तरुणानं गाड्यांना दाखवली वाट, पाहा VIDEO

या व्हिडीओमध्ये आपण पाहून शकतात माणसांना घर सोडून छतावर राहण्याची वेळ आली आहे. जनावरांना छतावर नेता येऊ शकत नाही त्यामुळे ते पाण्यात उभ्या आहेत. तर गाड्या वाहून जात आहेत. दुसरीकडे नागरिकांच्या घरात खूप पाणी शिरल्यानं छतावर संसार थाटण्याची वेळ आली आहे. पुरामुळे मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झालं आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे कोलकातासह पश्चिम बंगालच्या इतर भागात दुर्गापूजेच्या दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर असाच सुरू राहिला तर आणखीन भीषण स्थिती निर्माण होऊ शकते अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.

संपादन- क्रांती कानेटकर

First published: October 18, 2020, 11:53 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading