प्रतीकात्मक फोटो
नवी दिल्ली, 22 एप्रिल : कित्येक लोक झोपे त घोरतात. याचा सर्वात जास्त त्रास त्यांच्या आजूबाजूला झोपणाऱ्यांना होतो. पण हेच घोरणं तुम्हाला पैसे कमवून देईल असं सांगितलं तर… साहजिक तुम्हाला आश्चर्य वाटले. पण तुम्हाला त्रासदायक वाटणाऱ्या घोरण्याचा हा असाही एक फायदा आहे. एक तरुणी आपल्या पार्टनरच्या घोऱण्यामुळे मालामाल झाली आहे. घोरण्यातून पैसे कमवण्याची भन्नाट आयडियाही तिने दिली आहे. प्रत्येक संकटाचही संधी दडलेली असते, असं म्हणतात. या तरुणीने याला घोरणंही अपवाद नाही हे दाखवून दिलं आहे. तिने आपल्या प्रियकराच्या घोऱण्याचा असा फायदा करून घेतला की त्यामुळे तोसुद्धा धक्क झाला. तरुणीने त्याच्या घोऱण्यातून पैसे कमवले. आता घोरण्यातून कमाई कशी करायची? याची भन्नाट आय़डियाही तिने सोशल मीडियावर शेअर केली केली आहे.
26 वर्षांची अॅना मालफेअर आणि तिचा 33 वर्षांचा बॉयफ्रेंड लुईस दोघंही एकत्र राहत होते. लुईसला झोपेत घोरण्याची सवय होती, त्यामुळे अॅनाची झोप उडाली होती. घोरणे ही कायम सामान्य समस्या नसते, या गंभीर आजाराचेही असू शकते लक्षण तिने लुईसला तो घोरत असल्याने आपल्याला झोप लागत नाही असं सांगितलं. पण त्याने आपण घोरतो हे नाकारलं. शेवटी त्याला पुरावा द्यायचा म्हणून अॅनाने एकदा त्याचा घोरण्याचा आवाज रेकॉर्ड केला आणि तो लुईसला ऐकवला. लुईसलाही तेव्हा लाज वाटली. त्यानंतर लुईसचा घोरण्याचा आवाज रेकॉर्ड करण्याची सवयच अॅनाला लागली. वर्षभर तिने त्याचा आवाज रेकॉर्ड आला आणि याला एक वर्ष झालं म्हणून तिने तो सोशल मीडियावर शेअर करण्याचं ठरवलं. तिने याबाबत तिच्या काही मित्रमैत्रिणींना सांगितलं. तेव्हा त्यांनी अॅनाला एक भन्नाट आयडिया दिली. त्यांनी ही घोऱण्याची रेकॉर्डिंग स्पॉटीफायवर अपलोड करायला सांगितलं आणि हेच अॅनाच्या कमाईचं माध्यम बनलं. जिथं Snoring Machine नावाचा कंटेंट ऐकणाऱ्यांची संख्या दर महिन्याला 16 हजारांच्या जवळपास आहे. Spotify खात्यावर ज्याचे सर्वात लोकप्रिय संगीत म्हणजे लाइट स्नोरिंग. ऐन तारुण्यात असं काही घडलं की कायमची उडाली झोप; 80 वर्षांचे आजोबा गेली 60 वर्षे जागेच, तरी ठणठणीत आता हे वाचल्यानंतर नकोसं वाटणारं त्रासदायक घोरणंही तुम्हाला हवंहवंसं वाटेल. तुम्हाला ही कमाईची आयडिया कशी वाटली ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.