नवी दिल्ली 21 एप्रिल : जेव्हा मृत्यू माणसाच्या मागे सावलीसारखा असतो, तेव्हा त्याला काहीही करून आपला जीव वाचवायचा असतो. पण कदाचित ही भावना प्राण्यांमध्ये नसते. ते स्वतःच्या आधी इतरांचे प्राण वाचवतात. असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक कुत्रा गायींच्या कळपाचं रक्षण करताना दिसत आहे. पण तो त्यांना का वाचवत आहे? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ पाहावा लागेल.
@cctvidiots या ट्विटर अकाउंटवर अनेकदा अनोखे व्हिडिओ पोस्ट केले जातात. नुकताच अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये एक कुत्रा गुरांचे प्राण वाचवताना दिसत आहे. अनेकवेळा लोक ग्रामीण भागात कुत्रे पाळतात, कारण ते हुशार असतात आणि गाई चरायला मदत करतात. कुत्रे अनेकदा गाई-म्हशींची काळजी घेतात आणि त्यांच्यावर लक्ष ठेवतात. या व्हिडिओमध्येही कुत्र्याने असंच केलं आहे.
एखाद्या लीडरप्रमाणे तो कुत्रा गायींना जणू आपल्या पुढे चालायला सांगत आहे. तो असं करत आहे कारण त्याच्या मागे मृत्यू येत आहे! तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल, तर तुम्हाला समजलं असेलच की आम्ही कोणाला मृत्यू बोलत आहोत. सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे की, मागून एक सिंह रस्त्याने चालत आहे, जो गायींची शिकार करण्याच्या उद्देशाने त्यांचा पाठलाग करत आहे. त्याच सिंहापासून वाचवण्यासाठी कुत्रा मागून गायींचा पाठलाग करत आहे. या व्हिडिओला 23 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत तर अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने म्हटलं की, सिंह हा विचार करत असेल की न पळताही त्या गायी पकडता येतील, त्यामुळे पळण्याची गरज नाही. एकाने म्हटलं, की व्हिडिओ अर्धा आहे, पुढे जाऊन त्याने गायी पकडल्या असतील. आणखी एकाने म्हटलं की, सिंह फक्त आरामात रस्त्यावर फिरायला निघाला आहे, असं वाटतं.