JOIN US
मराठी बातम्या / Viral / फक्त हिंमत पाहिजे! कुत्र्याने असं काही केलं की सिंहही घाबरुन पळाला, VIDEO पाहून नेटकरीही थक्क

फक्त हिंमत पाहिजे! कुत्र्याने असं काही केलं की सिंहही घाबरुन पळाला, VIDEO पाहून नेटकरीही थक्क

व्हिडिओमध्ये कुत्रा सिंहावर भुंकताना आणि न घाबरता त्याचा सामना करताना पाहून युजर्स थक्क झाले आहेत. जे पाहून यूजर्सचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही.

जाहिरात

कुत्र्याला घाबरून पळाला सिंह

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 08 मे : सोशल मीडियावर सर्वाधिक व्हायरल होणाऱ्या व्हिडिओंमध्ये वन्यजीवांशी संबंधित व्हिडिओ युजर्सना खूप आवडतात. नुकताच सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये एक सिंह जंगलात कुत्र्याला घाबरताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये दिसतं, की सिंहाला आपल्या समोर कुत्रा दिसताच तो त्याच्यावर हल्ला करायला लागतो. मात्र, कुत्रा घाबरून पळून जाण्याऐवजी सिंहावरच भुंकायला लागतो. हे पाहून सिंहही घाबरतो. व्यक्तीची हिंमत पाहूनच घाम फुटेल, चक्क सिंहांसोबत खेळायला गेला अन् पुढे दिसलं चकित करणारं दृश्य व्हिडिओमध्ये कुत्रा सिंहावर भुंकताना आणि न घाबरता त्याचा सामना करताना पाहून युजर्स थक्क झाले आहेत. जे पाहून यूजर्सचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. हेच मुख्य कारण आहे, की हा व्हिडिओ सगळ्यांनाच आवडला आहे. सिंहाला जंगलाचा राजा म्हटलं जातं, मात्र तोच सिंह एका कुत्र्याला घाबरता पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. मोठमोठे प्राणीदेखील सिंहासमोर उभा राहण्याची हिंमत करत नाहीत. अशा स्थितीत सिंहाला घाबरवणाऱ्या कुत्र्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.

संबंधित बातम्या

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. जो ilhanatalay_ नावाच्या अकाऊंटवरून इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये दिसतं, की कुत्र्याला जंगलात पाहताच सिंह त्याच्यावर हल्ला करू लागतो. त्याचवेळी कुत्राही सिंहावर भुंकतो आणि त्याचा पाठलाग करतो. कुत्र्याचं धाडस पाहून सिंह स्तब्ध होतो आणि घाबरून मागे जाऊ लागतो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर युजर्सचे लक्ष वेधून घेत आहे. सध्या सोशल मीडियावर या व्हिडिओने सर्वांनाच हैराण केलं आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्स सतत मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिलं की, ‘अपनी गली के कुत्ते भी शेर हैं.’. सिंहाची खिल्ली उडवताना आणखी एका युजरने लिहिलं, ‘क्या शेर बनेगा रे तू.’ व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ बातमी देईपर्यंत सोशल मीडियावर 71 हजारांहून अधिक युजर्सनी लाईक केला आहे आणि 20 लाखांहून अधिक युजर्सनी तो पाहिला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या