JOIN US
मराठी बातम्या / Viral / डॉक्टरांनी केला चमत्कार! मृत बाळाला अवघ्या 4 मिनिटांत पुन्हा जिवंत केलं; पाहा LIVE VIDEO

डॉक्टरांनी केला चमत्कार! मृत बाळाला अवघ्या 4 मिनिटांत पुन्हा जिवंत केलं; पाहा LIVE VIDEO

डॉक्टरांनी मृत बाळाला जिवंत केल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

जाहिरात

मृत बाळ जिवंत झालं.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 10 जून : जीवन-मृत्यू तसा कुणाच्या हातात नाही. पण अनेकदा असे काही चमत्कार होतात, ज्यावर विश्वास ठेवणंही कठीण असतं. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. ज्यात मृत जन्माला आलेल्या बाळा ला डॉक्टरांनी जिवंत केलं आहे. अवघ्या चार मिनिटांत त्यांनी या मृत बाळाच्या शरीरात प्राण फुंकले आहेत. हा व्हिडीओ पाहून तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. डॉक्टर ज्यांना देव म्हटलं जातं, ते उगाच नाही हे या व्हायरल व्हिडीओतून स्पष्ट होतं. कारण या डॉक्टरांनी एका बाळासाठी यमराजाशीही झुंज दिली आहे. यमराजाने बाळाचे नेलेले प्राण त्यांनी परत खेचून आणले आहेत. बाळ मृत म्हणून त्यांनी त्याला सोडून दिलं नाही. तर शेवटपर्यंत ते प्रयत्न करत राहिले आणि अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळालं आहे.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता डॉक्टरांच्या हातात एक बाळ आहे. सामान्यपणे बाळ जन्माला येताच ते रडू लागतं. पण हे बाळ रडत नव्हतं. त्याच्या शरीराचीही हालचाल नव्हती. ते श्वास घेत नव्हतं, हृदयाचे ठोके होत नव्हते. पण तरी डॉक्टरांनी आशा सोडली नाही. त्याला जिवंत कऱण्यासाठी खूप प्रयत्न केले. काय हा चमत्कार! अवघ्या 3 दिवसांचं बाळ ‘चालू’ लागलं; विश्वास बसत नाही तर पाहा Viral Video त्याच्या पाठीवर मारत राहिले. पाठीवर हात फिरवत राहिले. अंगठ्यानी छातीवर हृदयाजवळ दाब दिला. तोंडातून ऑक्सिजन देण्याचा प्रयत्न केला. काही मिनिटांनी बाळ जिवंत होईल, अशी आशा वाटली. मध्येच बाळाची हालचाल होताना दिसत होता. त्याच्या तोंडातून हलका आवाज येत होता. अखेर चार मिनिटं सलग प्रयत्नानंतर बाळ रडू लागलं. मृत बाळाच्या शरीरात प्राण आले.

Sogadu Shivanna नावाच्या  फेसबुक युझरने आपल्या फेसबुक अकाऊंटवर  हा व्हिडीओ पोस्ट केला आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. हा व्हिडीओ पाहणाऱ्या प्रत्येकाच्या अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी आलं असेल.

Shocking! अवघ्या 2 वर्षांच्या चिमुरड्याला जन्मठेप; कारणही धक्कादायक

संबंधित बातम्या

व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. अनेकांनी या डॉक्टरांचं कौतुक केलं आहे, त्यांचे आभार मानले आहेत. डॉक्टरांना देव का म्हणतात हे या व्हिडीओतून स्पष्ट झाल्याचं अनेकांनी म्हटलं आहे.

तुमची या व्हिडीओवरील प्रतिक्रिया आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या