नवी दिल्ली, 02 जून : बाळाचा विकास हळूहळू होत असतो. नुकत्याच जन्मलेल्या बाळा ला जसं आपण ठेवू तसं राहतं. म्हणजे त्याचा स्वतःच्या शरीरावर कंट्रोल नसतो, त्याला काहीच समजत नसतं. जसजसं बाळ मोठं होतं, तसतशी त्याची एकएक क्रिया ते स्वतः करू लागतं. त्याला स्वतःच्या पायावर उभं राहून चालायला किमान वर्ष जातं. असं असताना अवघ्या तीन दिवसांचं बाळ मात्र चक्क चालू लागलं आहे. ज्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. बाळाची शारीरिक हालचाल हळूहळू होते. म्हणजे सुरुवातीला ते पालथं होतं, नंतर पोटावर घसटत पुढे जातं, नंतर गुडघ्यावर चालतं, हळूहळू ते स्वतःच्या पायावर उभं राहतं आणि आपल्या लुटूलुटू पावलांनी चालतं. पण सामान्यपणे बाळ 6-8 महिन्यांत बसून रांगायला लागतं. त्यामुळे तीन दिवसांचं बाळ चालू लागलं म्हटल्यावर कुणालाही आश्चर्याचा धक्काच बसेल. पण बाळाच्या आईवडिलांनी आपल्या या बाळाचं हे करतब आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. जर हे कॅमेऱ्यात कैद झालं नसतं, तर कदाचित कुणी सांगून यावर विश्वासच बसला नसता. किंबहुना हा व्हिडीओ पाहिल्यावरही अनेकांचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसत नाही आहे. OMG! बाळाने पहिलं पाऊल टाकताच असं काही घडलं की…; VIDEO पाहूनच थक्क व्हाल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, एका छोट्याशा बेडवर हे बाळ आहे. जे स्वतःच स्वतःच्या पोटावर पालथं झालं आणि हातापायांनी जोर लावत उठून चालण्याचा प्रयत्न करत आहे. चालण्यासाठी ते धडपड करत आहेत. इन्स्टाग्राम पोस्टवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार हे बाळ फक्त 3 दिवसांचं आहे. जे स्वतःचं डोकं सावरत, गुडघ्यावर चालण्याचा प्रयत्न करत आहे. डेली मेलच्या वृत्तानुसार ही चमत्कारिक घटना आहे ती अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनियातील. Shocking! अवघ्या 2 वर्षांच्या चिमुरड्याला जन्मठेप; कारणही धक्कादायक डेली मेलशी बोलताना बाळाची आई समंथा मिचेलने सांगितलं, जे तीन दिवसांचं मूल शरीर नीट हाताळू शकत नाही, त्याने चालण्याचा प्रयत्न करावा, हे पाहून मला आश्चर्य वाटलं. आम्ही हॉस्पिटलमध्ये होतो आणि मी पाहिलं की ती बेडवर डोकं उचलून चालण्याचा प्रयत्न करू लागली. तिचं डोकं अजिबात पडत नव्हतं. ती खूप हळू चालत होती. मी तिचं डोकं धरायचा प्रयत्न करताच ती उभी राहू लागली. माझी आई माझ्यासोबत होती. तिलाही आश्चर्य वाटले. तिनेही असं काही पाहिलं नव्हतं.
बाळाच्या आईने @samanthaelizabeth या आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.