जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Shocking! अवघ्या 2 वर्षांच्या चिमुरड्याला जन्मठेप; कारणही धक्कादायक

Shocking! अवघ्या 2 वर्षांच्या चिमुरड्याला जन्मठेप; कारणही धक्कादायक

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

खरंतर या मुलाने काहीच गुन्हा केलेला नाही. तो निष्पाप आहे पण तरी त्याला जन्मठेप ठोठावण्यात आली आहे.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

प्योंगयांग, 29 मे : अवघ्या दोन वर्षांच्या चिमुकल्यााल जन्मठेपेची शिक्षा… वाचूनच तुम्हाला धक्का बसला असेल. दोन वर्षांचं मूल जे आता कुठे आपल्या लुटूलुटू पायांनी चालू लागलं असतं, बोबडे बोल बोलण्याचा प्रयत्न करतो, अशा मुलाला शिक्षा तीसुद्धा जन्मठेपेची, असं का? असा त्याने गुन्हा काय केला, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तुम्हाला यावर विश्वासही बसत नसेल पण हे खरं आहे. उत्तर कोरियातील हे धक्कादायक प्रकरण आहे. लहान मुलांनी गुन्हा केला तर त्यांना वेगळ्या पद्धतीची शिक्षा दिली जाते. त्यांना कमीत कमी शिक्षेची तरतूद असते. त्यांना तुरुंगाऐवजी बालसुधारगृहात ठेवलं जातं. पण असे काही देश तिथं लहान म्हणूनही मुलांची गय केली जात नाही. असंच हे धक्कादायक प्रकरण.

News18लोकमत
News18लोकमत

दोन वर्षांचा मुलगा ज्याला काही समजत नाही, तो काय गुन्हा करेल, असं तुम्ही म्हणाल. पण तुम्हाला वाचून आणखी मोठा धक्का बसले खरंतर या मुलाने काहीच गुन्हा केलेला नाही. तो निष्पाप आहे पण तरी त्याला जन्मठेप ठोठावण्यात आली आहे. OMG! बाळाने पहिलं पाऊल टाकताच असं काही घडलं की…; VIDEO पाहूनच थक्क व्हाल डेली स्टारच्या वृत्तानुसार, या मुलाच्या कुटुंबाने घरात बायबल ठेवलं होतं, त्यामुळे त्याला ही शिक्षा दिली आहे. धार्मिक पुस्तक पालकांनी जपून ठेवलं असलं, तरी त्याची शिक्षा सुनावली तेव्हा पालकांसोबतच दोन वर्षांच्या चिमुरडीलाही जन्मठेपेची शिक्षा झाली. अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य अहवालात याचा उल्लेख करण्यात आला आहे. मुलाला ही शिक्षा उत्तर कोरियाच्या राजवटीत मिळाली आहे, ज्यामध्ये गुन्ह्याची शिक्षा तीन पिढ्यांना दिली जाते. लेकीने रडणाऱ्या बाळाला शांत केलं अन् आजी-आजोबांना झाली अटक; नेमकं प्रकरण काय? उत्तर कोरियामध्ये, इतर धर्मांचे पालन करण्यासाठी भयानक शिक्षा आहेत. 2011 मध्ये गोळीबार पथकाने एका कुटुंबाची हत्या केली होती. याशिवाय इतर देशांचं संगीत आणि चित्रपट पाहण्यासाठीही अशीच शिक्षा दिली जातं. उत्तर कोरियामध्ये लोकांना फक्त 3 टीव्ही चॅनेल पाहायला मिळतात, ज्यांचे कार्यक्रम सरकार ठरवतात. येथे शिकणाऱ्या मुलांना घरातूनच खुर्च्या आणि टेबल दिले जातात आणि त्यांना केव्हाही सरकारी कामात लावलं जातं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात